Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *विधानसभेत पून्हा गाजणार...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*

 

राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी?

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील बीएस इस्पात कंपनी यांच्या ४० हजार मॅट्रिक टन कोळशाच्या गैरव्यवहार प्रकरणी २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः लक्षवेधी सूचना मांडलेली होती. त्यावर मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात उत्तर सादर केलेले आहे. परंतु मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेले निवेदन व आजवर झालेली चौकशी यावर कुठलीही प्रगती दिसून आलेली नाही. याचाच अर्थ असा की जिल्हा खनीकर्म विभाग व खनीकर्म मंत्रालय सुनियोजितरित्या या घोटाळ्याला दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची दाट शंका उपस्थित होत आहे.बीएस इस्पात कंपनी मार्की मांगली मुकुटबन या खाणीचे प्रबंधकीय संचालक भवानी प्रसाद मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कासनगोटूवार या दोघांनी मिळून यवतमाळ खाणीकर्म विभागाशी आर्थिक साठगाठ करून कोट्यावधी रुपयाच्या राष्ट्रीय संपत्तीची दिवसाढवळ्या चोरी केल्याची बाब प्रत्यक्षात समोर आलेली असताना , पोलिसात तक्रार व गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा या उद्योगपतीला शासन-प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावरून मदत करीत आहे त्याचाही खुलासा झाला पाहिजे यासाठी आ. धोटे आग्रही आहेत.

बीएस इस्पात चा वरोरा येन्सा येथील विद्युत उत्पादन प्लांट बंदच

बीएस इस्पात कंपनीला मारकी मांगली मुकुटबन येथे जी कोळसा खाण आवंटित झालेली आहे त्यामधली प्रमुख अट अशी आहे की या खाणी मधून जेवढा कोळसा बाहेर काढण्यात येईल त्यापैकी अर्धा कोळसा व्यावसायिक विक्रीसाठी व अर्धा कोळसा सबसीडराईज रेटवर वरोरा येथील बीएस इस्पात कंपनीच्या पावर प्लांट च्या वापरासाठी ही खाण त्यांना दिलेली आहे परंतु वास्तविक सत्य व धक्कादायक बाब अशी आहे की वरोरा येथील पावर प्लांट हा बंद अवस्थेत असून तो पूर्ण क्षमतेने आज पर्यंत चालू झालेला नाही आणि त्यामुळे बीएस इस्पात कंपनीने यापूर्वीच इथल्या साडेतीनशे कामगारांना कामावरून काढून टाकले अशा बंद प्लांटमध्ये कोळसा येतोच कसा आणि जर तो कोळसा आलास तर या ठिकाणी आजपर्यंत किती कोळसा एकूण उत्पन्नाच्या पैकी विद्युत निर्मितीसाठी आणण्यात आला व त्यापासून किती विद्युत निर्मिती झाली याची सुद्धा चौकशी विशेष समितीमार्फत होण्याची नितांत गरज आहे कारण राज्य शासन  किंवा केंद्र शासन जर बीएस इस्पात कंपनीला सबसिडी रेट चा कोळसा विद्युत निर्मितीसाठी देत असेल आणि हा सबसिडी  रेटचा कोळसा बी एस इस्पात कंपनी काळ्या बाजारात जर याची विक्री करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून हा मोठा कोळसा घोटाळा सत्ताधारी लोकांच्या आशीर्वादाने सुरू असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.

पुन्हा १० कोटी रुपये किमतीच्या कोळस्याची अफरातफरी वरोरा पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद

बीएस इस्पात कंपनीने इंडो युनिक फ्लेम कोलवासरी यांना एकुण ४२२५१.१४ मॅट्रिक टन कोळसा स्वच्छ धुण्यासाठी दिलेला होता. मात्र इंडो युनिक फ्लेम कोलवासरी चे मालक विपुल चौधरी यांनी त्यापैकी केवळ १६२१९. ३७ मॅट्रिक टन कोळसा स्वच्छ धुवून कंपनीला परत केला. याचाच अर्थ असा की त्यांनी २५०३१.७७ मॅट्रिक टन कोळशाचा घोटाळा केला. बीएस इस्पात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भवानी प्रसाद मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कासनगोटूवार हे कोळसा हेराफेरीचे मुख्य सूत्रधार असून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मार्किं मांगली कोळसा खाणी मधून १०० कोटीहून अधिक कोळशाची अपरातपर केली असल्याची खात्रीदायक माहिती आहे. या संदर्भात आपण स्वतः जातीने लक्ष ठेवून आहोत आणि येथे सुरू असलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी विधानसभेत पुन्हा लक्षवेधी सूचना मांडून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे .

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...