Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आ. सुभाष धोटेंनी केली...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील मौजा जेवरा आणि लोणी परिसरात दि. ६ मे २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, घरांना, भिंतींना भेगा पडल्या, झाडे उन्मळून पडले, वीजखांब कोसळल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. यात जेवरा गावात जवळपास ७५ घरांचे तर लोणी येथे जवळपास २५ ते ३० घरांचे नुकसान झाल्याची तर २ नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार सुभाष धोटे यांनी या परिसरात दौरा करून जेवरा, लोणी परिसरातील नागरिकांच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले तसेच घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून  नुकसानग्रस्तांना भरीव शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली असल्याची माहिती आ. धोटे यांनी ग्रामस्थांना दिली.यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, ज्येष्ठ नेते सुरेशराव मालेकर, माजी संचालक भाऊराव चव्हाण, जेवरा येथील रसूल पाटील, अनिल गोंडे, सुधाकर भोयर, विठोबा गेडाम, लोणी येथील घनश्याम नांदेकर, ज्ञानेश्वर आवारी, देवराव सोनटक्के, मुसळेजी, डॉ. पिंपळशेंडे, सिद्धार्थ सातपुते, गजानन काकडे यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...