Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *वेकोलीच्या शक्तिशाली...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*

 

नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात कोळसा उत्खननासाठी घडवून आणत असलेल्या शक्तिशाली ब्लास्टींगने वेकोली परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याने चांगल्या बांधलेल्या घरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यासंदर्भात वेकोलिकडे गावकऱ्यांनी अनेकदा  तक्रारी केल्या. परंतु शक्तिशाली ब्लास्टिंगवर वेकोलीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवणी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, चिंचोली, हीरापुर परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणींचे जाळे विणले आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलीत वेळी अवेळी शक्तिशाली ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे वेकोली परिसरातील गावांना ब्लास्टिंगचा मोठा फटाका सहन करावा लागत असून सुसज्ज दिसणाऱ्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याने अनेक घरांच्या भिंती कोसळल्याच्या तसेच शेतातील बोअरवेल खचल्याच्या घटना घडत आहेत. कोळसा खाणीतील ब्लास्टींगची तीव्रता वाढविल्याने कोळसा खान लगत असलेल्या गोवरी गावालगत कोळसा खाण असल्याने  शक्तिशाली ब्लास्टिंगचा मोठा फटाका गावकऱ्यांना बसला आहे. यासंदर्भात गावकरी व शेतकऱ्यांनी वेकोलिकडे तक्रारी केल्या. परंतु वेकोली प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे गोवरी आणि परिसरातील प्रभाकर जुनघरी, दिपक पिंपळकर यासह अनेक नुकसानग्रस्त नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन ही संपूर्ण हकिकत त्यांना अवगत करून दिली.हयाम अंतर्गत सुरू असलेल्या राजुरा ते वनसडी आणि पवनी ते चंद्रपूर राज्यमार्गाच्या गोवरी येथील अर्धवट पुलाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच गोवरी येथे घेतली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोवरी आणि परिसरात वेकोलीच्या शक्तीशाली ब्लाँस्टींगमुळे येथील घरांना हादरे बसणे, तडे जाणे तसेच मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या. यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन आ. सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्यमहाप्रबंधक एलियास हुसेन यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत या परिसरात यापुढे नागरिकांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वेकोलीचे सीएमडी जे. पी. द्विवेदी यांच्याकडे निवेदन देऊन नुकसानग्रस्तांना तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्याची तसेच भविष्यात वेकोलीच्या ब्लाँस्टींगमुळे स्थानिक नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...