Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / पोलीस स्टेशन भद्रावती...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी मिळाली की, अमोल गेडकर याने विवोर्डी गुरुनगर भद्रावती येथे आशिष वाकडे याचे घरी अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची विक्रीकरीता साठवणुक करून ठेवली आहे. अशा खात्रीशीर खबरेवरुन सदरची माहीती मा. पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे सा. यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टाफचे मदतीने खबरेप्रमाणे सदर ठिकाणी जावुन आशिष वाकडे याचे घराची पंचासमक्ष कायदेशीररित्या सुगंधीत तंबाखुबाबत तपासणी केली असता त्याचे घराचे बांधकाम सुरू असलेल्या स्वयंपाक खोलीत मजा १०८ सुगंधीत तंबाखु व ईगल सुगंधीत तंबाखु असा एकुण एकुण १,७१,४२०/-रू चा माल अंवैद्यरित्या मिळुन आल्याने सदरचा सुगंधीत तंबाखुचा मुददेमाल पंचनामा कार्यवाही करून जप्त करून पो रटे भद्रावती येथे अप कं २८७/२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादवी सहकलम अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ त्या अंतर्गत नियम कलम ३०(२), (२६) (२) (३), ३, ४, ५९(i) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी नामे १) अमोल नंदकिशोर गेडकर वय २७ वर्ष रा. डोलारा तलाव भद्रावती, २) आशिष दसरथ वाकडे वय ३० वर्ष रा. विचोर्डी गुरूनगर भद्रावती यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. उप-विभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विपीन इंगळे सा., सफौ गजानन तुपकर, पोहवा अनुप आस्टुनकर, नापोअ जगदीश झाडे, निकेश देंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...