Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :- राजुरा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या राजुरा- माथरा - गोवरी - पोवनी या राज्य मार्गावरील रामपूर जवळील रस्त्यालगत शिल्लक राहिलेले काम, तसेच गोवरी गावाजवळ असलेल्या फुलाचे व रस्त्याचे अर्धवट बांधकाम येथे आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांना घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि येथेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास घेत स्थानिक नागरिकांच्या अडचणी, व्यथांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.राजुरा - माथरा - गोवरी- पवनी या राज्य मार्गाचे काम मागील तीन-चार वर्षापासून सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे परंतु अनेक ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांचे, पुलांचे बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रामपूर जवळ तुरळक काम शिल्लक असून गोवरी नाल्यावरील पूल्याचे कामे अर्धवट असल्याने नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. पावसाळ्यापूर्वी येथे काम पूर्ण होणे गरजेचे असून या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही संबंधित विभाग कामे पूर्ण करीत नसल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आज अर्धवट असलेल्या रस्ते, पुलाची पाहणी केली आणि गोवरी येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३० मे २०२४ पर्यंत अर्धवट कामे पूर्ण करण्याचे तसेच मुख्य मार्गावरील ओव्हर हेड विद्युत तारांची उंची वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रसंगी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंता अभिशेख सरकार, विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता बडगु, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विठ्ठल पाचभाई, शिवराम लांडे, गजानन उरकुडे, अशोक पिंपळकर, मधुकर सोयाम, विकास पिंपळकर, श्रीहरी परसुटकर, सचिन पाचभाई, रामदास पाचभाई, आकाश नांदेकर, चेतन बोभाटे, विठ्ठल गोरघाटे, हरिश्चंद्र जूनघरी, नीलकंठ पोथले, पुरुषोत्तम पाचभाई, पापा शेख, प्रकाश काळे, प्रभाकर जुनघरी यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...