Reg No. MH-36-0010493

Wednesday February 05, 2025

35.91

Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *प्रतिभा धानोरकरांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

 

जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   

चंद्रपूर :-जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर आणि शहर काँग्रेस कमिटी चंद्रपूरची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली एन. डी. होटेल, चंद्रपूर येथे पार पडली.यावेळी जिल्हाध्यक्षांनी चंद्रपूर जिल्हातील सर्व तालुका काँग्रेस कमेटी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्या स्थितीत पक्षाची वाटचाल, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक समस्या, पक्ष बळकटीसाठी आवश्यक उपक्रम अशा विविध विषयांवर चर्चा केली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस तसेच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षातील राष्ट्रीय, प्रादेशिक, जिल्हा तथा स्थानिक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी काँग्रेस उमेदवार श्रीमती धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, परिश्रम घेतले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत श्रीमती प्रतिभाताई धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून येणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आनखी एकजुटीने काम करून सहाही विधानसभा मतदारसंघ विजयश्री खेचून आणण्यासाठी संकल्पबध्द होऊन कामाला लागण्याचे आवाहन केले तर श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी सुध्दा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अहोरात्र परिश्रम घेतले तसेच काँग्रेस तसेच इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी विशेष सहकार्य करुन लोकसभा निवडणुकीत मदत केल्याबद्दल आभार मानले. या प्रसंगी बंडू धोतरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, राजुभाऊ झोडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी चंद्रपूर - १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, अँड. विजय मोगरे, महिला काँ. शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगिता अमृतकर, इंटक कामगार नेते के. के सिंग, अंबिकाप्रसाद दवे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे घनश्याम मुलचंदाणी प्रशांत काळे. विजय गावंडे, खेमराज तिडके, विजयराव बावणे, रंजन लांडे, एजाज अहमद, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, प्रदेश महासचिव अश्विनी खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी सभापती दिनेश चोखारे, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, कार्याध्यक्ष मतीन कुरेशी, किसान काँ. जिल्हाध्यक्ष दिपक वाढई, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव माजी महिला काँ. अध्यक्ष चित्राताई डांगे सुनीता अग्रवाल, अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर शहर यु. काँ. जिल्हाध्यक्ष राजेश अडुर.माजी शहराध्यक्ष नंदु नागरकर प्रदेश प्रतिनिधी प्रविण पडवेकर.गुरू गुरूनुले एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, यु. काँ. प्रदेश सचिव कुणाल चहारे, यासह जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन महेश तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी मानले.

ताज्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...