Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *माजरी येथील माता दुर्गा...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

 

 

रिपोर्टर✍️ भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

भद्रावती:-तालुक्यातील माजरी येथील काली माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्नविषबाधा  झाल्याची माहिती दिनांक १४ रोज रविवारला पहाटे तीन वाजता उघडकीस आली आहे. यात गुरुफेक राम यादव राहणार माजरी वय ८० वर्ष या वृद्धाचा मृत्यू झाला असून विषबाधा झालेल्या २३२ रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा व भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली.सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत कार्यक्रमाचे आयोजक बबलू राम यादव यांना चौकशीसाठी माजरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजरी येथील न्यू हाउसिंग एरिया,  काली माता मंदिरात दिनांक १३ रोज शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद रात्रो १० वाजेपर्यंत चालला. त्यानंतर रात्रो १ वाजताच्या दरम्यान महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या शेकडो नागरिकांना उलट्या, संडास व पोटदुखी सुरू झाल्याने त्यांना माजरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आज पहाटे चार वाजेपर्यंत २३२ रुग्णांना माजरी, वरोरा व भद्रावती येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या सर्वांना महाप्रसादातील भोजनातून अन्न विषबाधा झाली असल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.दिनांक १४ रोज रविवारला सकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कराटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय आसुटकर, वरोरा येथील डॉक्टर खुजे आदींनी रुग्णांना भेट दिली असून याप्रकरणी अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आपल्या आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...