Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *"एक हात मदतीचा" अंतर्गत...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य*

 

ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले

 

✍️Dinesh Zade

 

भद्रावती:-तालुक्यातील पिपरी (देशमुख) येथील रुग्ण प्रमोद संभाजी नवघरे यांना उपचाराकरीता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे उपक्रम “श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान” अंतर्गत आर्थीक सहकार्य करण्यात आले.  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था असून समाजातील गोरगरीब-गरजू व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, गरीब शेतकरी तसेच समाजातील दुर्बल घटक यांना न्यासच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक मदत करीत असते. ट्रस्टच्या उद्देशानुरूप समाजाच्या मदतीकरीता वेगवेगळे  असे मुख्य सात अभियान राबवीत आहे.समाजातील दिन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषीत, शेकरी-शेतमजुर निराधार, दिव्यांग महिला, विद्यार्थी, गंभीर आजारी रुग्ण आदीसाठी ट्रस्टव्दारे विविध योजना उपक्रम चालविल्या जात आहेत. यामध्ये श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, स्व. सिध्दुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म.ना. पावडे क्रिडा स्पर्धा योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संमृध्दी योजना, हिंदुहृद्य वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना असून याचा नागरीकांनी लाभ सुध्दा मिळत आहे.ट्रस्टव्दारा चालविण्यात येणारे उपक्रम अभियानांचा समाजातील नागरीकांनी लाभ घेण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी यावेळी सांगीतले आणी ट्रस्ट गरजू, गरीब नागरीकांना नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे सोबतच संस्थापक सदस्य तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे.ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे माजी नगरसेवक प्रशांत कारेकर तसेच ट्रस्टचे गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

ताज्या बातम्या

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...