Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा - गडचांदूर मार्गातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा - गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी* *• कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला निवेदन*

*राजुरा - गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी*    *• कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला निवेदन*

*राजुरा - गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी*

 

 कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला निवेदन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-राजुरा - गडचांदूर मार्गावरील रामपुर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रेल्वे पुलाखाली रामपुर टर्नींग पॉईंटवर बसणारे मासविक्रेत्यांकडून कोंबडींचे पख, टाकावू मास सर्रासपणे फेकून दिले जात आहे. यामुळे रेल्वेपुलाखाली दुर्गंधीयुक्त अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. या मार्गावरुन जाणारे शेतकरी, नागरीक व लगत राहणाऱ्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रामपुर टर्नींग पॉईंटवर बसणारे मासविक्रेत्यांकडून दुर्गंधीयुक्त अस्वच्छतेचा नागरीक व शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेवून तातडीने स्वच्छता करण्यात येवून सदर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी संबंधीत व्यावसायीकांना ताकीद देण्याची मागणी कापनगांव येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.सदर समस्येचे निवेदन तहसिलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, ग्रामपंचायत सचिव यांना देण्यात आले असून तातडीने समस्येवर तोडगा काढणार असल्याचे तहसिलदार यांनी आश्वस्त केले. रेल्वे पुलाजवळून शेतकऱ्याना बैलबंडी घेवून येतांना दुर्गंधीमुळे बैल बुजाडणे, बैल परत फिरणे असे प्रकार घडून येत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामाने ये-जा करणे मोठे कठीण झाले आहे. तसेच या दुर्गंधी व अस्वच्छेमुळे नागरीकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मासविक्रेत्यांच्या दुकानातील गर्दीमुळे अपघाताचे प्रमाणही  वाढत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.समस्येचे निराकरण करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते रतन काटोले, रोशन कावळे, एकनाथ मुठ्ठलकर, साईनाथ सातपुते, रोशन वाढई, सुमीत पिंपळकर, श्रीकृष्ण निवलकर, राजेंद्र मोरे, प्रभाकर कळंबे, मनोज झुंगरे आदींनी निवेदनातून प्रशासनाकडे मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...