Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *कडोली:हडसती येथे रेती...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*कडोली:हडसती येथे रेती तस्कर जोमात प्रशासन कोमात*

*कडोली:हडसती येथे रेती तस्कर जोमात प्रशासन कोमात*

*कडोली:हडसती येथे रेती तस्कर जोमात प्रशासन कोमात*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-सास्ती पोलीस चौकी क्षेत्रातील कढोली (बु.) तसेच चंद्रपूर पोलीस क्षेत्रात येत असलेले हडस्ती सदर क्षेत्रात स्थानिक ट्रॅक्टर धारकांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उत्खनन केले जात आहे. हडस्ती-कढोली (बु.) पुला खालून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून वर्धा नदीच्या पात्राला अक्षरशा खिंडार पाडल्याचे पाहायला मिळत आहे.  स्थानकातून वारंवार तक्रारी करून देखील प्रशासना कडून कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. प्रशासनातील काही अधिकारीच सदर वाळू तस्करीला सहकार्य करत असून वाळू तस्करांनी यातून मोठे घबाड जमवून अधिकारी, कर्मचारी यांचे तोंड गोड केले असल्याचे स्थानकातून बोलले जात आहे.कढोली (बु.) - हडस्ती या दोन्ही गावाच्या मध्य असलेली वर्धा नदी हे सध्या कोरडाईच्या मार्गावर असल्याने नदीचे पात्र वाळू तस्करांना मोकळे झाले आहे. सध्या रेती घाट लिलाव झाला नसल्यामुळे स्थानिक व नजीकच्या गावातून घर बांधकामा करीता वाळू ची मोठी मांग तसेच इतर शासकीय, निम शासकीय व खासगी कंत्राटदार देखील याचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्धा नदीच्या पात्रारातून जे. सी. बी. व मजुराच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू (रेती) उत्खनन करून विक्री केली जात असून याचे पडसाद वर्धा नदीच्या पात्रात पाहायला मिळत आहे.आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून प्रशासना कडून कुठली हि कारवाई होत नसल्याने इतर वाळू तस्करांची हिम्मत उंचावली आहे. आज वाळू तस्कर कमालीचे मुजोर झाल्याने त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांच्या गेम करायला देखील मागे पुढे पाहणार नाही असे त्यांच्या वागणुकीतून दिसत आहे. याला स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, देखील सहकार्य करत आहे कि काय ? अशी शंका निर्माण होते कारण भर दिवसात नागरिकां समोरून ट्रॅक्टर मधून भर टच्चं वाळू भरून जात असून ते नागरिकांच्या निदर्शनात येतात परंतु स्थानिक पदाधिकारी यांच्या निदर्शनात येत नाही हे संशयास्पद आहे.काही दिवसा आधी मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी जिल्ह्यात होत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा घाल्याने आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा झपाटा लावला होता यात कित्तेक अवैध रेती तस्कर, सुगंधित तंबाखू, मादक पदार्थावर कारवाई करण्यात आली होती. याने संपूर्ण जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते परंतु कालांतराने स्थानिक गुन्हे शाखेने नरमाई घेतल्याने अवैध व्यावसायिक त्याच झपाट्याने व्यवसायाकडे वळून धुमाकूड घातला आहे. सदर रेती उत्खननाकडे महसूल विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस प्रशासन लक्ष देतील काय? असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...