Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ओबीसी आयोगाचं तथा तहसीलदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ओबीसी आयोगाचं तथा तहसीलदार कोरपना आदेशाचे उल्लंघन करत Rccpl सिमेंट कंपनी कडून मुजोरी* *परसोडा चुनखडी लिज क्षेत्रात रात्री अवैध खाणकाम व वाहतूक! रात्री चोरी ने वाहतूक केल्यास,वाहन चालक,मालक, कंपनी व कंपनी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा*

*ओबीसी आयोगाचं तथा तहसीलदार कोरपना आदेशाचे उल्लंघन करत Rccpl सिमेंट कंपनी कडून मुजोरी*    *परसोडा चुनखडी लिज क्षेत्रात रात्री अवैध खाणकाम व वाहतूक! रात्री चोरी ने वाहतूक केल्यास,वाहन चालक,मालक, कंपनी व कंपनी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा*

*ओबीसी आयोगाचं तथा तहसीलदार कोरपना आदेशाचे उल्लंघन करत Rccpl सिमेंट कंपनी कडून मुजोरी*

 

*परसोडा चुनखडी लिज क्षेत्रात रात्री अवैध खाणकाम व वाहतूक! रात्री चोरी ने वाहतूक केल्यास,वाहन चालक,मालक, कंपनी व कंपनी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

कोरपना:-Rccpl सिमेंट कंपनी चे परसोडा चुनखडी लिज क्षेत्र तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर. ह्या कंपनी ने पेसा अनुसुचित ग्रामपंचायत क्षेत्रातील स्थानिक लोकांना व प्रकल्पग्रस्तांना फसवणूक करून दलाल मार्फत कवडीमोल भावाने काही जमीन खरेदी करत, ग्रामपंचायत संमती विना उत्खनन सुरू करून वाहतूक सुरू केली होती, पेसा अनुसूचित ग्रामपंचायत ने हे लिझ क्षेत्र रद्द करण्याबाबत दोन वेळा ग्रामपंचायत ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पाठविले होते परंतु जिल्हाधिकारी ने काही ही निर्णय घेतला नाही. म्हणून श्री नेमीचंद काटकर हयांच अन्नत्याग आमरण उपोषणाला प्रतिसाद देत मा. हंसराज अहिर साहेब,अध्यक्ष ओबीसी आयोग ने उपोषण स्थळी भेट देऊन, कंपनी चे अवैध खाणकाम व वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश तहसीलदार कोरपना तथा उपस्थित ठाणेदार कोरपना यांना दिले होते. त्यावेळी उपोषण स्थळी, आयोग अध्यक्ष तथा पोलिस अधिकारी कोरपना समक्ष,तहसीलदार कोरपना ह्यांनी जाहीरपणे ,मागासवर्गीय आयोग भारत सरकारचे विभागीय आयुक्त नागपूर येथे, आयोग चे पुढील सुनावणी होईपर्यंत कंपनी चे खाणकाम व वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.  परंतु मागिल काही दिवसांपासून कंपनीने, दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करत मुजोरीने रात्री अवैध खाणकाम व वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे, ह्या संदर्भात ,कंपनी परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रचे मुख्य व्यवस्थापक नरेंद्र गौल्लाशी, अरूण मैदमवार ,सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी फोन वर विचारणा केली असता, कंपनीचे खाणकाम व वाहतूक बंद असून रस्ता दुरुस्त करत असल्याचे सांगितले आहे , परंतु कंपनी मध्ये जमा झालेले खनिज साठा बघता कंपनी अंधारात चोरी ने अवैध खाणकाम व वाहतूक करत, आयोग तथा तहसीलदार कोरपना ह्यांच आदेशाचे उल्लंघन करत आहे. तरी तहसीलदार कोरपना व पोलिस अधिकारी कोरपना ह्यांनी ह्याच गंभीर दखल घेत, यथाशीघ्र,कंपनीचे परसोडा चुनखडी लिज क्षेत्रातील चालू असलेलं खाणकाम व वाहतूक ची चौकशी करून, कायदेशीर कारवाई करण्यात यावे, प्रशासन अधिकारी ने तात्काळ कारवाई करावी,अन्यथा पुढील ओबीसी आयोग सुनावणी मध्ये प्रशासन अधिकारीचे कामचुकार पणा आयोग समोर ठेवण्यात येईल व पुढे आयोग कडून होणार पुढील कार्यवाही स संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार राहतील. तसेच कंपनी रात्री अवैध खाणकाम व वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले तर ,सर्व प्रकल्पग्रस्त रात्री कंपनी चे अवैध खाणकाम बंद करून व वाहतूक गाडी पकडून संबंधित वाहन चालक- मालक, कंपनी व कंपनी अधिकारी वर गंभीर गुन्हा दाखल केला जाईल,असे अरूण वासुदेव मैदमवार सामाजिक कार्यकर्ता तथा नेमीचंद काटकर,गंगाधर कुंठावार, सखाराम तलांडे,राजु मैदमवार, निर्मलाताई भिमराव कोरांगे, बालकुमार कांबळे, मंगेश बांदुरकर इ. नी  गंभीर इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...