Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *महाथापाड्या निवडणूक...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*महाथापाड्या निवडणूक प्रमुखाचा जनताच भोंगा आवरेल:रंजन लांडे अध्यक्ष तालुका काँग्रेस राजुरा*

*महाथापाड्या निवडणूक प्रमुखाचा जनताच भोंगा आवरेल:रंजन लांडे  अध्यक्ष तालुका काँग्रेस राजुरा*

*महाथापाड्या निवडणूक प्रमुखाचा जनताच भोंगा आवरेल:रंजन लांडेअध्यक्ष तालुका काँग्रेस राजुरा*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

राजुरा:-तथाकथित विकासपुरुष म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या महाथापाड्या निवडणूक प्रमुख उठसूट थापा मारून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. म्हणे विकासकामांचा झंझावात सुरू आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण, रोखठोक भुमिकेमुळे महाराष्ट्रभर त्यांना मानणारा वर्ग आहे. अशा नेत्याला उमेदवारी मिळाल्याने विजय सोपा झाला आहे. त्यांनी म्हणे चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी गेल्या दहा वर्षात "न भुतो न भविष्यती" असा विकासनिधी खेचून आणला. आता पहिले हे समजून घ्या की एक एक चखचकित थाप आहे. कारण बघा बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी, वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, डिजिटल अंगणवाडी शाळा, सुसज्ज वाचनालये, महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती केंद्रे, युवकांसाठी रोजगार मेळावे, अद्ययावत क्रीडा संकुल यापैकी एकही काम बल्लारपूर, चंद्रपूर क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात शोधूनही सापडणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ वेळ मारून नेली आहे. अजून पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. आरोग्य व्यवस्थेचे म्हणाल तर जिल्हात अतिशय विदारक चित्र आहे. याला जबाबदार हे तथाकथित विकासपुरुषच आहेत. मुलभूत समस्या सोडविण्यासाठी निधी खर्च न करता कोट्यावधी रुपये केवळ मनोरंजन, नाचगाणे करण्यावर खर्च करून आपल्या चेल्या चपाट्यांचे खिसे भरण्याचेच काम झाले असावे अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे तसेच यावरून या तथाकथित विकासपुरुषावर प्रचंड रोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नागरिक तो राग व्यक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अनुसूचीत जमातीच्या हक्काचा ठक्कर बाप्पा योजनेचा निधी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा निधी, नक्षलग्रस्त भागाचा विकास योजना निधी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये खर्च न करता संपूर्ण निधी बल्लारपूर मतदार संघात वळविला हाच काय सबका साथ सबका विकास, दिवस रात्र आपल्या नेत्याची नकल करणाऱ्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या कर्तृत्वशुन्य व्यक्तीला हे वास्तव कधीच दिसणार नाही आणि पचणारही नाही. त्यामुळे ते स्वतःला कितीही शहाने भासवत असले तरी जनतेने यांचे खरे चेहरे ओळखलेले असून येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही एवढे मात्र निश्चित.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...