Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *महिलांनी चुल आणी मूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी- सौ.उषाताई भोयर* *अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा.* *अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार*

*महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी- सौ.उषाताई भोयर*    *अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा.*    *अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार*

*महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी- सौ.उषाताई भोयर*

*अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा.*

अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार

सावली: - जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानार्थ जगात सर्वत्र साजरा केला जातो.अनेक कर्तृत्वान स्त्रियांनी आपल्या कार्यातून तसेच पुरुष्यांचा खांद्याला खांदा लावीत देशाचे नाव लौकिक केलेले आहे त्यांचा सन्मान व स्मरून करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांचा या दिवशी सत्कार केला जातो.त्याच निमित्याने मौजा.अंतरगाव येथे,पाथरीचे मावळते पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांचा निरोप समारंभ व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती,या सत्काराबद्दल सत्कारमुर्ती पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांनी सर्व महिला भगिनी व आयोजकांचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पत्नी यशोधरा यांनी गौतम बुद्ध यांनी गृहत्याग केला तेवा त्यांनी जे धैर्य दाखवत कुटुंबाचा सांभाळ केला व नंतर पतीच्या मार्गांवर चालत त्यांनी सुद्धा गृहत्याग करीत संन्यास धारण केले त्यांचे हे त्याग जगाला आदर्श देणारे आहे एक स्त्री कश्याप्रकारे आपला परिवार व तसेच समाजात वावरात असते किती समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते राणी यशोधरा हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत, त्यांचा आदर्श सर्व महिलांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.उषाताई भोयर यांनी महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी,येत्या काळात महिला या अबला नवे तर सबला बनून जगासमोर या असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.जयश्री चेकबंडलवार यांनी केले.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...