Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / स्कूल बॅग मध्ये टाकून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

स्कूल बॅग मध्ये टाकून सुगंधीत तंबाखूची तस्करी पारडी येथे रचला सापळा :कोरपना पोलिसाची धडक कारवाई

स्कूल बॅग मध्ये टाकून सुगंधीत तंबाखूची तस्करी    पारडी येथे रचला सापळा :कोरपना पोलिसाची धडक कारवाई

स्कूल बॅग मध्ये टाकून सुगंधीत तंबाखूची तस्करी

 

पारडी येथे रचला सापळा :कोरपना पोलिसाची धडक कारवाई

 

दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- अवैद्य धंद्यावर कोरपना पोलीस ॲक्शन मोड मध्ये येऊन कारवाई करत आहे. यातच होंडा एक्टिवा वाहना द्वारे स्कूल बॅग मध्ये टाकून सुगंधीत तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोन इसमांना गुरुवार दिनांक सात ला सकाळी साडेआठ वाजता दरम्यान पारडी येथे ताब्यात घेण्यात आले.सुगंधीत तंबाखू वाहतुक कार्यवाही बाबत पेट्रोलिंग करीत असताना , मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तेलंगणा राज्यातील बेला येथून होंडा एक्टिवा वाहन क्रमांक एम एच २७ डी के ६४४२ या वाहनाने दोन इसम अवध रित्या सुगंधीत तंबाखू गडचांदुर येथे जात आहे. अशी माहिती मिळाली. कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथे मिळालेल्या वर्णनानुसार गाडी थांबून झडती घेतली असता. एका काळ्या कलरच्या स्कूल बॅग मध्ये इगल हुक्का तंबाखू २० नग पॉकेट किंमत सहा हजार दोनशे सह होंडा एक्टिवा वाहन अंदाजी किंमत पन्नास हजार असा एकूण ५६ हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण भोलेशवर मंडाले (२८) , मोहम्मद जिक्रान मो मीनहाज सिद्दीकी (१९) दोन्ही राहणार पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कलम ३२८ ,१८८,२७२,२७३,३४ भादवी सह कलम २६ (२) अ ३०(२),३,४,९ अ अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सह कलम १३०/१७७ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कोरपना चे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी गणेश डवरे, मंचक देवकते, नामदेव पवार व कोरपना पोलिसांनी केली.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...