Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा क्षेत्रातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा क्षेत्रातील आदिवासींच्या तिर्थक्षेत्रांचा होणार विकास : आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश*

*राजुरा क्षेत्रातील आदिवासींच्या तिर्थक्षेत्रांचा होणार विकास : आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश*

*राजुरा क्षेत्रातील आदिवासींच्या तिर्थक्षेत्रांचा होणार विकास : आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:--  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या एकुण ९ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी धोरण निश्चित करून या सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी, आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे क्षेत्रात जिवती, कोरपना तालुक्यात बहुसंख्य नागरिक हे आदिवासी, कोलाम समाजातील आहेत. या भागात आदिवासींचे एकूण ९ तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत. नागरिकांचे ते आराध्य दैवत असून लोक मनोभावे पूजा, अर्चना करतात मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे अक्षय्य दुर्लक्ष होत असल्याने निधी अभावी आदिवासींचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास खुंटलेला आहे. आदिवासी बांधवांच्या तीर्थक्षेत्राचा विकास करणे, तेथील नागरीकांना सर्व सोई-सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाकडून सन २०२४-२५ पासून आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाचे धोरण निश्चित करण्यात यावे. धोरण निश्चितीनंतर आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाकरिता चंदपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राचे ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना राज्याचे आदिवासी विकास विभाग प्रभारी मंत्री तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, आ. सुभाष धोटे यांची मागणी स्वागतार्ह असून आदिवासी विकास विभागाशी चर्चा करून यावर लवकरच धोरण निश्चित करुन शासन निर्णय घेण्यात येईल व आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. आ. सुभाष धोटेंच्या मागणीला यश आले असून जिवती कोरपना तालुक्यासह महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...