Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *क्षेत्रातील आरोग्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*क्षेत्रातील आरोग्य समस्या सोडविण्याचे आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश* *जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आढावा बैठक*

*क्षेत्रातील आरोग्य समस्या सोडविण्याचे आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश*    *जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आढावा बैठक*

*क्षेत्रातील आरोग्य समस्या सोडविण्याचे आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश*

 

*जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आढावा बैठक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मतदार संघातील रुग्णालयीन समस्यांविषयीची संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी आ. सुभाष धोटेंनी क्षेत्रातील आरोग्य सुविधांबाबत शासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष, गैरसोयी याबाबत संताप व्यक्त करीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन या अत्यंत आवश्यक समस्या निवारणार्थ तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या. क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल जीवती तालुक्यातील जिवती ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असल्याने सर्व वैद्यकीय साधन सामुग्रीसह रुग्णालय तात्काळ रुग्णाच्या सेवेकरिता सुरु करावे, याबाबत मी स्वतः आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यासंबंधने स्थानीक नागरिकांनी अनेकदा मोर्चे आंदोलने करून विभागाचे लक्ष वेधले मात्र विभागाला अजूनही जाग आलेली नाही. रुग्णालयीन इमारतीचे काम पूर्ण होऊन २ वर्ष पूर्ण होत आहे मात्र शासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे गोंडपिपरी येथे तालुक्याचे ठिकाणी अस्तित्वात असलेली इमारत पूर्णता जीर्ण झाली असल्याने तात्काळ जागा रुग्णालयाचे नावाने करुन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावी. तसेच कोरपणा तालुक्यातील गडचंदुर हे औद्योगिक शहर असल्याने रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे गडचंदुर रुग्णालयाचा ३० बेड चे श्रेणीवर्धित १०० बेडच्या उपजिल्हारुग्णालयाचा प्रस्ताव तयार करुन शासनास तात्काळ पाठविण्यात यावा अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे याना दिल्या.बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी स्नेहल रहाटे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकार, तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील टेंभे, वैद्यकीय अधिक्षक गोंडपिपरी डॉ. नामपल्ले, वैद्यकीय अधिक्षक गडचांदुर डॉ. गायकवाड, उपविभागीय अभियंता किशोर येडे, शुभम चंदावर यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...