Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे:...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे*

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे*

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- पाल हेरीस यांनी १९०५ मध्ये शिकागो येथे रोटरी ची स्थापना केली. तेव्हा फक्त ४ सदस्य होते. त्यांनी या छोट्याशा कार्यचे वटवृक्षात रुपांतर करून असंख्य सभासद व उपशाखा निर्माण केल्या आहेत. यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. पोलीओ निर्मुलनात मोठे योगदान दिले, सुरुवातीला रक्तदान शिबीरांचे आयोजन व्हायचे मात्र अलीकडे आर्थोपेडीक उपचार, स्त्रीयांच्या आरोग्य समस्यांबाबत मेमोग्राफी व अन्य सुविधा सुध्दा पुरविण्यात येतात हे वाखाणण्याजोगे कार्य आहे. येणाऱ्या काळात केवळ शहरी भागापर्यंत मर्यादित न राहता समाजातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठीही रोटरीने कार्य करावे असे आवाहन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी अंगद नगर, बामणवाडा रोड , राजुरा येथे रोटरी क्लब राजुरा द्वारा आयोजित रोटरी उत्सव २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी केले. रोटरी उत्सवाच्या माध्यमातून परिसरातील आबालवृद्धांना मनोरंजन व विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान सायं ५ ते १० :३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी आयोजकांच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना एक्झाम पॅड चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रितेश जयस्वाल, जेष्ठ व्यापारी राजेंद्र चांडक, बामणवाडाचे सरपंच भारती पाल, राजुरा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. कमल बजाज, सचिव रोटे सारंग गिरसावळे, कोषाध्यक्ष रोटे. निखिल चांडक, मयुर बोनगिरवार, अॅड. जगजीवन इंगोले, इंजि. शुभम खेडेकर यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...