आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
येथून जवळच असलेल्या एसीसी सिमेंट कंपनी ते उसगाव पर्यंतच्या रस्त्याची गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रंजित यादव, तहसीलदार विजय पवार, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, काँग्रेस नेते रोशन पचारे, माजी जि.प.सभापती नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उसगाव सरपंच निविता ठाकरे, न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमरशेट्टीवार, संध्या बोधनवार, प्रभारी ठाणेदार प्रशांत साखरे व उसगाव, नकोडा आणि घुग्घुसच्या ग्रामस्थांनी पाहणी केली.
उसगाव येथील ५० ते ६० वर्षापासून सुरु असलेला रस्ता ग्रामपंचायतची पूर्वपरवानगी न घेता तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेताच एसीसी कंपनीने बंद केला.
त्याअनुषंगाने यासंदर्भात उसगाव येथे प्रशासनाची, उसगाव, नकोडा घुग्घुस ग्रामस्थांची आणि एसीसी कंपनी व्यवस्थापनाची बैठक पार पडली. बैठकीत दोन दिवसात प्रशासनातर्फे उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी बोलतांना राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे म्हणाले, उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी एसीसी सिमेंट कंपनीला प्रशासनातर्फे आदेश देण्यात आले होते परंतु एसीसी सिमेंट कंपनीने मुजोरी करीत हा रस्ता सुरु केला नाही एसीसी सिमेंट कंपनीची दडपशाही कदापी सहन केली जाणार नाही. दोन दिवसात उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु केला नाहीतर एसीसी सिमेंट कंपनीविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.
यावेळी घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, काँग्रेस नेते प्रेमानंद जोगी, माजी पं. स. सभापती वर्षा ताजने, सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, अमोल थेरे, विनोद चौधरी, धनंजय ठाकरे, रत्नेश सिंग, शाम आगदारी, श्रीकांत सावे, मानस सिंग, तुलसीदास ढवस, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, विवेक तिवारी व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...