Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *लोणी येथील पोटच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*लोणी येथील पोटच्या मुलाने आईला संपविले तर वडील जखमी* *घरगुती वादातून आई-वडिलावर कुराडीने वार*

*लोणी येथील पोटच्या मुलाने आईला संपविले तर वडील जखमी*    *घरगुती वादातून आई-वडिलावर कुराडीने वार*

*लोणी येथील पोटच्या मुलाने आईला संपविले तर वडील जखमी*

 

*घरगुती वादातून आई-वडिलावर कुराडीने वार*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

लोणी:-कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.मनोज पांडूरंग सातपुते वय वर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ४ आणि हातावर २वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर २वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.आता याप्रकरणी पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...