Tranding

Reg No. MH-36-0010493

Wednesday January 22, 2025

28.5

Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *तुकडोजी महाराजांचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*तुकडोजी महाराजांचे विचार मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे - ॲड. संजय धोटे* *· चुनाळा येथे भव्य विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा*

*तुकडोजी महाराजांचे विचार मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे - ॲड. संजय धोटे*    *· चुनाळा येथे भव्य विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा*

*तुकडोजी महाराजांचे विचार मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे - ॲड. संजय धोटे*

 

*चुनाळा येथे भव्य विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे मानवी जीवनाला चांगली कलाटणी देणारे असून हे विचार कृतीत आल्यास व रोजच्या जीवनात अंमलात आणल्यास मानवामध्ये अमुलाग्र बदल घडून येणे नक्कीच शक्यप्राय होईल, असे मत माजी आमदार तथा भाजपा नेते ॲड. संजय या. धोटे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील चुनाळा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व शिव जयंती उत्सव समिती, चुनाळा कडून विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक  माजी आमदार ॲड. संजय धोटे, अध्यक्ष म्हणून केंद्रीय सदस्य तथा तालुकाध्यक्ष अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळ ॲड. राजेंद्र जेणेकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपतालुका सेवा अधिकारी लटारु मत्ते, प्रचार प्रमुख गजानन बोबडे, मोहन वडस्कर, भाजपा तालुका महामंत्री इंजी. प्रशांत घरोटे, अनिल पिदूरकर, देवराव गायकवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना ग्रा.पं. सदस्य तथा स्पर्धेचे आयोजक रविंद्र गायकवाड यांनी गावातील विकास कामे उपस्थितांच्या लक्षात आणून देत गावातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, मैदाणी सरावासाठी क्रीडा संकूल, शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा यासाठी पांदन रस्ते यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून उपस्थित अतिथींनी ही या मागण्या पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. प्रमुख अतिथी ॲड. राजेंद्र जेणेकर यांनी अशा स्पर्धांमधून महापुरूषांचे विचार हे सामान्यापर्यंत भजनाचा माध्यमातून पोहचत असून या विचारातून ग्रामविकास होण्यास बळ मिळत असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी उपस्थिती पाहूण्यांना भेट स्वरुपात महापुरूषांच्या विचारांची पुस्तके देण्यात आली. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अंकुश चव्हान यांनी तर प्रास्तावीक व आभार ग्रा.प. सदस्य रवींद्र गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेकरीता रंजीत डाखरे, गजानन हेपट, अनिल तामटकर, वैभव माणूसमारे, कमलेश वांढरे, अभय माणुसमारे, स्वप्नील निखाडे, रवी वांढरे, सत्यपाल निमकर, सुरेश आस्वले,‍ मनिष कायरकर यांचेसह मंडळातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह. 22 January, 2025

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह.

वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक. 21 January, 2025

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक.

वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...