आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस
दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्हा महासचिव अँड. अक्षय लोहकरे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे व घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी आपले मनोगत वेक्त केले.
महाराष्ट्राचे अराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा,रयतेवर जीवापाड प्रेम करणारा असा रयतेचा राजा , महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती (19 फेब्रुवारी) शिवजयंती म्हणून सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात साजरी केली जाते
ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला.त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी उरला नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमता पेटता अंगार ,एक ज्वालामूखी आणि अखेर ती वेळ आली.
सहियाद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी
शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाई भोसले होते.शिवराय लहानपणा पासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले आणि ते माझ्या राजाने पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली आणि रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली
मित्रांनो त्यावेळी स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद ,शिवा काशिद,मुरारबाजी, येसाजी कंक,अशा अनेक शूर वीरांनी आपल्या महाराजांना साथ दिली होती. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून शिवाजी महाराज व मावळे स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. म्हणूनच
मित्रांनो शिवरायांनी आपल्या चतुर बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला हरवून टाकले.आणि आई जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली
असे आपले विचार मांडून हा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी उपस्थित घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव उपाध्यक्ष जगदीश मरबाते दत्ता वाघमारे महासचिव योगेश नगराळे कोषाध्यक्ष अशोक भगत संघटक राकेश पारशीवे it शेल प्रमुख आशिष परेकर आशिष हटकर अमर भगत अमन व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...