आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती चे शेतकरी अनिल भोंग यांनी ३५ पोते धान तांदुळ काढण्यासाठी निखार राईस मिल, चंदनखेडा येथे नेले. त्यावर त्यांना फक्त १२ क्विंटल तांदूळ मिळाले. धानाचा उतारा अत्यंत कमी आल्याने त्यांनी राईस मिल मालक आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती कडे तक्रार केली. परंतु त्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला नाही. आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती कडे लिखित तक्रार दाखल केली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती ने सदर तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सदस्य, प्रवीण चीमूरकर यांचेकडे दिली. प्रवीण चीमूरकर यांनी सदर तक्रार तहसीलदार भद्रावती आणि अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य, प्रवीण चीमूरकर यांनी दि.३१ जानेवारीला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत हा विषय उचलुन धरला आणि पुरवठा विभागाकडून लगेच कारवाई करण्याचे पत्र काढण्यात आले.
वैध मापण शास्त्र विभागाचे निरिक्षक सुनील वाडे यांनी दि. १४ फेब्रुवारी ला निखार राईस मिल, चंदनखेडा येथे भेट देऊन तपासणी केली असता वजन काटा पडताळणी प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर वाडे यांनी निखार राईस मिल वर कारवाई केली.
*चौकट :
माझे जवळपास ५ ते ६ क्विंटल चे नुकसान झाले असुन मला नुकसान भरपाई मिळाली पाहीजे. असे पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत होऊ नये यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
अनिल भोंग, शेतकरी, भद्रावती.
शेतकऱ्यानी आता ग्राहक अधिकार जाणुन घेण्याची गरज आहे. ग्राहक संरक्षण कायदा असुन सुद्धा ग्राहकांची फसवणूक होते ही चिंतेची बाब आहे. शेतकरी बांधवानी आता यावर आवाज उठवला पाहीजे. कोठेही आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आवाज उठवा आणि तक्रार दाखल करा. आपल्याला न्याय नक्की मिळेल. ग्राहक संरक्षण कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...