आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : नगरपरिषदेच्या समावेशनात प्रचंड गैरव्यवहार झाल्याच्या निषेधार्थ घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली स्व.प्रमोद महाजन मंच आठवडी बाजार घुग्घूस येथे आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 02 ते चार वाजे पर्यंत धरना आंदोलन करण्यात आले
घुग्घुस ग्रामपंचायतीला 31/12/2020 रोजी नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्या नंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली शासन नगर विकास विभागाने 10/02/2022 रोजी घुग्घुस नगरपरिषदेच्या आकृतीबंधास मान्यता दिली.
त्यानुसार दिनांक 12/01/2024 रोजी समावेशन आदेश पारित करण्यात आला यामध्ये शहरातील युवकांवर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे
शासन निर्णयानुसार जे कर्मचारी नगरपरिषदेच्या प्रथम उदघोषणे पूर्वीच ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर स्थायी स्वरूपात होते त्यांनाच नगरपरिषदेत घेण्यात येईल अन्यथा अपात्र करण्यात येईल असे असतांना स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी सतीश सागर मुरार नाली सफाई कर्मचारी व अमोल जुनारकर शिपाई या युवकांचा ग्रामपंचायत मध्ये स्थायी स्वरूपात घेण्यासाठी 28/05/2020 रोजी ठराव घेण्यात आला व दिनेश अनिल बावणे यांचा ठराव 29/06/2020 चा असतांना बावणे याला मुरार व जुनारकर यांच्या आधी नियुक्ती देऊन त्याची नोकरी वाचविण्यात आली.
या समावेशनात वरिष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून बावणे सारख्या नवीन कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर ठेवण्यात आले अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकण्यात आले.
त्यांनी इतर ठिकाणी असलेल्या नगरपरिषदेत पाठविण्यात येणार आहे
ज्यांनी अनेकवर्षं शहरांच्या विकासात योगदान दिले त्यांना ही डावलण्यात आले
या संपूर्ण प्रकरणात प्रचंड आर्थिक घोटाळा करण्यात आला असून अनेक कर्मचाऱ्यांकडून 25 ते 35 हजार वसुली करण्यात आली असल्याचे ही चर्चा ? असल्याने सदर समावेशनाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊन या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली नगरपरिषदेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली,
आपल्या अध्यक्षीय भाषणात रेड्डी यांनी नगरपरिषद हा भ्रष्टाचारात कसा बरबटलेला आहे याचा पाढाच वाचला तसेच शेवटच्या श्वासा पर्यंत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ अशी ग्वाही दिली
नगरपरिषदेत अन्याय झालेल्या नगरपरिषदेच्या कर्मचारी लिना घागरगुंडे यांनी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराची परिपूर्ण माहिती दिली आधी ग्रामपंचायत असतांना सरपंच हा कर्मचाऱ्यांना नोकरीतुन काढून टाकण्याची धमकी द्यायचे आता इतर अधिकारी कर्मचारी दबावात वागवतात आपला हक्क मांगणे जर लोकशाहीत गुन्हा असेल तर मला शिक्षा द्यावी मी प्रत्येक शिक्षा भोगण्यास तैयार असून नगरपरिषदेच्या या भ्रष्टाचाराला मी पाठीशी घालणार नाही मी घाबरणार नाही आणि माझ्या सहकाऱ्यांनो तुम्ही ही घाबरू नका आता आपण शेवट पर्यंत या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढा देऊ तुम्ही सोबत रहा अशी विनवणी ही केली
सदर आंदोलनात महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के,महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील,सरस्वती कोवे, प्रीती तामगाडगे,भाविका आटे,योगिता मून,
काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलिम शेख,अनिरुद्ध आवळे,रोशन दंतलवार सोशल मिडिया अध्यक्ष,विशाल मादर,मोसीम शेख,तिरुपती महाकाली,युवा नेते अनुप भंडारी,सुनील पाटील, शहजाद शेख,अरविंद चहांदे,भैय्या भाई,दिपक पेंदोर,रफिक शेख,कुमार रुद्रारप,कासम शेख,सन्नी कुम्मरवार,अंकुश सपाटे,हरीश कांबळे, व मोठ्या संख्येने नगरपरिषदेचे कर्मचारी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...