Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / जिल्हा भाजपाच्या महामंत्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे

जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे
  1. घुग्घुस :

 

  • भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री पदावर घुग्घुस येथील विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • चंद्रपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांची नावे जाहीर केली आहे.

 

  • घुग्घुस शहरात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राची भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात विवेक बोढे यांनी स्थापना केली. अभिनव कार्यशैली मुळे अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या सेवा केंद्रातून 30 हजारांच्या वर लाभार्थ्यांना निःशुल्क लाभ मिळवून दिला आहे.
    • भाजपाचे घुग्घुस शहराध्यक्ष पासून ते भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष या पदावर विवेक बोढे यांनी यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण केला आहे.

 

  • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी अनेक सेवाकार्य केली आहेत. गरजूंना विश्वकर्मा योजनेचा लाभ, आयुष्यमान कार्ड काढून देणे, एक रुपयात पिक विमा काढून देणे, महाज्योती फ्री टॅब योजना विद्यार्थ्यांसाठी राबवणे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा विविध शासकीय योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्राचे नि:शुल्क वितरण, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मोफत काढून देणे, दिव्यांग बांधवांना मदत. महिलांना बचतीसाठी प्रयास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना, जिल्हाभर श्री. देवराव भोंगळे यांच्या वाढदवसानिमित्त महारक्तदान शिबीर घेऊन विक्रमी 3026 दात्यांचे रक्तदान, प्रत्येक महिन्याला शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांच्या व विविध आजारांच्या उपचारासाठी तुकडी रवाना, वेकोलिचा लोखंडी पुल दुचाकीच्या रहदारीकरिता सुरु, नकोडा-मुंगोली प्रतिबंधित पुल दुचाकीच्या वाहतुकीसाठी सुरु, सेवानिवृत्त सैनिकांचे निवास करमुक्त करणे, वेकोलि, एसीसी, लॉयड्स मेटल्स, नपच्या वतीने शहरात मोफत पाणी पुरवठा सुरु, सेवा केंद्रतर्फे टँकरने मोफत पाणी पुरवठा करणे, अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना सहा महिन्याचे घरभाडे तसेच शासकीय भूखंड घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून देणे, आनंदाचा शिधा वाटप, लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, शहरात हायमास्ट लाईट, रस्त्याचे सिमेंटीकरण, इलेक्ट्रिक केबल टाकणे, अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहिका उपलब्ध करून देणे, छोटया दुकानदारांना छत्री वाटप, गरजू लोकांना रक्तपुरवठा उपलब्ध करणे अशी अनेक कामे सातत्याने केली जात आहेत.

 

  • त्यामुळे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे हे अल्पावधित युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.  अपघात घडल्यास तत्काळ मदतीसाठी धावून जाणे, कर्करोगग्रस्तांना, अनाथ व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे अशी कार्यशैली त्यांची आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत अनेकांना जीवनदान मिळाले आहे.

 

  1. जिल्हा भाजपच्या सरचिटणीस पदावर विवेक बोढे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...