Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ०१ देशी कट्टा व ०२ जीवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ०१ देशी कट्टा व ०२ जीवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

आरोपी नौशाद शहादुतुल्लाह कुरैशी स्थानिक गुन्हेशाखा चंद्रपुरच्या ताब्यात

 

 

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवेध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रित्या हत्यार बाळगणान्यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. सदर मोहिमेदरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मोजा पडोली येथील डी.एन. आर. ऑफीसचे मागे रेल्वे लाईनजवळ एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे. सदर माहितीवरून पोउपनि, भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तप्प्रसणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पेटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे ०२ नग जीवंत काडतुस मिळून आले. सदर इसमाचे नाव विचारून त्याचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता त्याचेवर पोस्टे घघ्युस, पोस्टे राजुरा, पोस्टे वरोरा येथे अनेक चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच सदरचा इसम हा चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये फरार आहे. सदर इसमाविरूद्ध पोस्टे पडोली येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर इसमास पुढिल तपासकामी पोस्टे पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले.

 

आरोपीचे नाव :- नौशाद शाहादातुल्ला कुरेशी, वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा. वार्ड नं. २, बैंक ऑफ इंडीयाचे मागे, घुथ्युस, ता. जि. चंद्रपुर

 

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि, बोबडे, सपोनि, नागेशकुमार चतरकर, सपोनि, किशोर शेरकी, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा, संजय आतकुलवार, नापोकों, संतोष येलपुलवार, पोकॉ. गोपाल आतकुलवार, पोकों, नितीन रायपुरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...