Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नाट्यश्री कविता स्पर्धेतील...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे  विजयी

 

 

 

 *गडचिरोली* :  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात *"आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.

     या उपक्रमाचे सहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली येथील नवोदित कवी *पुरुषोत्तम लेनगुरे* यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  *"रमाई'* या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.

      पुरुषोत्तम लेनगुरे हे झाडीपट्टीतील नवोदित  कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रानगर्भ फुलत आहे ' मध्ये त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.

       त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

       या सहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  संगीता रामटेके, पुरुषोत्तम लेनगुरे, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, सुनील मंगर, प्रतिभा सुर्याराव,  मनिषा हिडको, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के,  वंदना मडावी,  सुजाता अवचट , प्रब्रम्हानंद मडावी, उपेंद्र रोहनकर,  प्रेमिला अलोने, ज्योत्स्ना बन्सोड , बाबाजी हुले,  प्रभाकर दुर्गे, दिनेश देशमुख, मधुकर दुफारे, अनुराग मुळे,  प्रशांत गणवीर, राजरत्न पेटकर , मुर्लीधर खोटेले , खुशाल म्हशाखेत्री, प्रमोद बोरसरे ,मिलिंद खोब्रागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

       या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

घुग्गुसतील बातम्या

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

घुग्घुस- : काल दिनांक 01सप्टेंबर 2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...