Tranding

Reg No. MH-36-0010493

Thursday January 23, 2025

27.89

Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / रेती तस्करी करणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई

रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई

रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई

 

 

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी:  राजेश येसेकर मो. 7756963512

 

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावती :  तालुक्यातील धानोली  नाल्यातून ट्रॅक्टर मध्ये अवैधपणे रेतीचा भरणा करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाव्दारे कारवाई करीत दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाव्दारे दि.९/२/२०२४ रोज शुक्रवारला रात्रो मध्यरात्रीनंतर करण्यात आली. मागील पंधरा दिवसा पूर्वीही मौजा मांगली जवळील नाल्यामधुन रेतीचे नेत असताना भद्रावती पोलीसांनी कारवाई केली होती.या कारवाईमुळे  भद्रावती तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.तालुक्यातील धानोली गाव परिसरातील एका नाल्यात हे दोन्ही ट्रॅक्टर अवैधपणे रेतीचा भरणा करीत होते. दरम्यान भद्रावती महसूल विभागाचे गौण खनिज पथक पेट्रोलिंगवर असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गौण खनिज पथकाने या दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले व दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले. धानोली येथील बोढे व पिर्ली येथील सातपुते यांच्या मालकीचे सदर ट्रॅक्टर असल्याचे महसूल विभागाद्वारे सांगण्यात आले. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी होत असल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाचे गौण खनिज पथक दिवस-रात्र या प्रकारावर लक्ष ठेवून कारवाई करीत आहे.सदर कारवाई गौण खनिज पथकाचे तलाठी मस्के व अन्य कर्मचाऱ्यांनी केली. घटनेची पुढील कारवाई महसूल विभागातर्फे सुरू आहे.

ताज्या बातम्या

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह. 22 January, 2025

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह.

वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...