Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *आ. सुभाष धोटे यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या जंगोदेवी देवस्थान येथे गेल्या वीस दिवसापासून यात्रेसाठी हजारो भाविक महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व अन्य राज्यातून या ठिकाणी अनवाणी पायाने दिंडीच्या रूपात वाजत गाजत चालत येत असतात तर काहीजण वाहनाने येतात. या ठिकाणी माता कंकाली देवी व माता जंगोदेवी गेल्या हजारो वर्षांपासून जागृत देवस्थान असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी व स्थानिक भाविक देतात. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या देवींचे दर्शन घेऊन आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभाग घेतला. स्थानिक नागरिक, भाविकांशी संवाद साधून येथे उपलब्ध सेवा, सुविधांचा आढावा घेतला. या ठिकाणी आ. सुभाष धोटेंच्या पुढाकाराने जंगो देवी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाल्यावरील ब्रिज, २७ सोलर इलेक्ट्रिक पॅनल, विद्युत सप्लाई व पिण्याच्या पाण्याची सोय हे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतले. त्यामुळे या परिसराचा कायापालट झाल्याचे व अजून उर्वरित इतर कामे करणार असल्याची प्रतिक्रिया आ. धोटे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जीवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाऊ निमजे, कैलास राठोड, सभापती  सुग्रीव गोतावडे, सिताराम कोडापे, श्यामराव कोटनाके, जंगू येडमे, भोजू पाटील आत्राम, चंदू वेटी सर, दिवाकर वेटी, गोविंदराव कुंमरे, भाऊराव पाटील चव्हाण, डॉ. अंकुश गोतावळे, शामराव गेडाम, विलास पवार, अशपाक शेख, सुनील शेळके, दत्तात्रे तोगरे, भानुदास जाधव, उत्तम कराळे, नारायण वाघमारे, लहुजी गोतावळे, विजय राठोड, कैलास कुंडगीर, अनंता बावळे, रामदास रणवीर, मोतीराम उदे, सित्रू मडावी, कोटणाके बाजीराव, लका रामभाऊ चव्हाण, मारुती मोरे, गोविंद ठोंबरे, हरिचंद्र जाधव, रोशन मरापे यासह असंख्य कार्यकर्ते, भाविक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेचे प्रास्ताविक सिताराम पाटील कोडापे यांनी केले तर आभार चंदू वेटी सर यांनी मानले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...