Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / चंद्रपुर सिमेंट कारखान्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

चंद्रपुर सिमेंट कारखान्यात विजयक्रांती कामगार युनियनच्या आंदोलनाला मोठे यश*

   चंद्रपुर सिमेंट कारखान्यात विजयक्रांती कामगार युनियनच्या आंदोलनाला मोठे यश*

 

 

*शिवानी वडेट्टीवार यांचे नेतृत्व - कामगारांमध्ये आनंदोत्सव, कंपनी व्यवस्थापन नरमले*

चंद्रपुर 

औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा तसेच स्थानिकांना अल्प वेतनात तसेच अनियमित काम देत कामगारांची थट्टा करणाऱ्या सिमेंट कंपनी व्यवस्थापना विरोधात विजय क्रांती संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी केले. विजय क्रांती संघटनेने हाती घेतलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाढते औद्योगीकरण हे जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारे असले तरी मात्र येथे कार्यान्वित झालेल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कामगारांची अवहेलना होत आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून तसेच प्रकल्पग्रस्त व इतर कंत्राटी कामगार यांना नियमित कामावर न घेता तसेच कामावर घेत असल्यास त्यांना अल्प वेतन देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील कंपनी व्यवस्थापनाकडून होत आहे. अशातच कामगारांच्या प्रश्नांना घेऊन वेळोवेळी आंदोलने करणारी जिल्ह्यातील नामवंत विजय क्रांती कामगार संघटना यांनी कटाक्षाने कंपनी व्यवस्थापनाच्या पिळवनुकी विरोधात गेल्या दोन दिवसापासून आंदोलन छेडले. यात विजय क्रांती कामगार संघटनेचे नांदा फाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी, व घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी या कंपन्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाद्वारे निदर्शने करण्यात आली.

तर विजय क्रांती संघटनेच्या सर्वेसर्वा तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी  या आंदोलनाचे नेतृत्व केले. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना बोलवून तसेच विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार व त्यांचे सहकारी यांना निमंत्रित करून यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. पार पडलेली चर्चा ही कामगाराच्या हिताची ठरली असून यात कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतचा प्रश्न तसेच त्यांना नियमित काम देण्यात यावे व स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या याबाबत करण्यात आलेली सकारात्मक चर्चा यावर कंपन्या व्यवस्थापनांनी नरमाई घेत येत्या 1 एप्रिल 2024 पासून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी स्वरूपात दोन दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल अशी भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.हे विजय क्रांती कामगार संघटनेचे मोठे यश असून कामगारांच्या यशस्वी लढा सार्थक ठरल्याचे मत विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस प्रामुख्याने विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे, विजय क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे,युवक काँग्रेसचे शिवा राव, बल्लारपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, युवक काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमेश शेख, युवक काँग्रेसचे कुणाल चाहारे,सचिन कत्याल, भानेश जंगम, प्रफुल जाधव, शालिनी भगत ,कुणाल गाडगे, राजेश नक्कनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

बॉक्स -:

हा विजय म्हणजे कामगारांच्या संघटित लढ्याची यश - शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक व अंबुजा या सिमेंट कंपन्यातील कामगार तसेच घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी मधील कामगार यांनी विजय क्रांती कामगार संघटनेवर विश्वास ठेवून आमचे नेतृत्वात कंपनी व्यवस्थापना विरुद्ध संघटित होऊन जो लढा दिला हे त्या लढ्याचे फलित असून आता कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. अन्याय विरुद्ध लढा असे विजय क्रांती कामगार संघटनेचे ब्रीद असून कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने प्रयत्नशील राहू व लवकरच कामगारांना अपेक्षित वेतन व काम मिळेल. असे प्रतिपादन प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...