Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *वैद्यकीय अधिकारी डॉक्टर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांबोडे ग्रामीण रुग्णालय कोरपणा यांच्या विरोधात आंदोलन* *अखेर डॉक्टरांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे*

*वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांबोडे ग्रामीण रुग्णालय कोरपणा यांच्या विरोधात  आंदोलन*    *अखेर डॉक्टरांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे*

*वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांबोडे ग्रामीण रुग्णालय कोरपणा यांच्या विरोधात  आंदोलन*

 

*अखेर डॉक्टरांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बांबोडे हे मुख्यालय हजर राहत नाही व रुग्णांना सेवा देत नाही याकरिता तालुका काँग्रेस कमेटी कोरपणा कडून ग्रामीण रुग्णालय  समोर दिनांक 27.1.2024 ला धरणे आंदोलन करण्यात आले  डॉ,बांबोडे हे दिनांक 10 /5 /2024 पासून ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाले परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधीही रुग्नाला सेवा दिली नाही किंवा कधीही ओपीडी चालवली नाही ते हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येऊन ऑफिसमध्ये बसून ऑफिसचे काम करून राजुरा निघून जातात डॉ, बांबोडे हे बाल रोग तज्ञ असून त्यांनी कधीही बाल रुग्णांना सेवा दिलेली नाही त्यामुळे कोरपणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील गोरगरीब रुग्णांना अतिशय त्रास होतो डॉक्टर बांबोडे हे कधीही मुख्यालय हजर राहत नसून रुग्णालयामध्ये  नेहमीच साफसफाई राहत नाही कार्यालयीन काम करिता किंवा दवाखान्याच्या कामाकरिता फोन केला असता डॉ, बांबोडे म्हणतात मी वैद्यकीय अधीक्षक आहे मला मुख्यालय राहण्याची गरज नाही ते स्वतः राजुरा येथे स्वतःचा खाजगी दवाखाना चालवितात एवढेच नव्हे तर आमच्या माहितीप्रमाणे आपल्या ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी दोन ते तीन महिने पगार विना काम करीत आहे व स्वतः गैरहजर राहून हजरीपटावर सही करत नाही व कर्मचारी उपस्थित राहून त्यांना गैरहजर दाखवून पत्र व कारणे दाखवा नोटीस देऊन मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाही सफाई कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी यांचे सहा ते सात महिन्यापासून पगार नाही रुग्णालयात कर्मचारी डॉक्टर बाबोडे गैरहजर असल्यामुळे कर्मचारी वेळेवर येत नाही त्यामुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र व इतर कामे जनतेची होत नाही डॉ, बांबोडे यांची मेळघाट येथे बालमृत्यू रोखण्यासाठी दिनांक 25/ 9/ 2023 ते 9 /10 /2023 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे तालुका धारणी जिल्हा अमरावती येथे प्रतिनियुक्ती दिली असताना दिनांक 9 /11 /2023 ते 23/ 11/ 2023 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र हरिहर तालुका धरणी येथे प्रतिनियुक्ती दिल्ली असता त्या दोन्ही ठिकाणी न जाता राजूरा येथे राहून स्वतःचा दवाखाना चालविला व जनतेची तथा शासनाची फसवणूक करून त्या काळातील वेतन त्यांनी उचलले याबाबत योग्य ती चौकशी करून डॉक्टर बांबोडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत आम्ही अनेकदा डॉक्टर बांबोडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला उडवा उडवी चे उत्तर देत होते याबाबत मा आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे मार्फत लेखी व तोंडी तक्रार देण्यात आली होती परंतु अजून पर्यंत कोणतेही कारवाई झालेली नाही म्हणून तालुका कमिटीतर्फे 27/ 1 /2024  रोजी शनिवारला ग्रामीण रुग्णालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनला कोरपणा ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी काही तासातच डॉक्टर बांबोडे यांनी आंदोलन स्थळी स्वतः येऊन चर्चा केली व लेखी स्वरूपात आंदोलन करताना लिहून दिले समोर अशी दिरंगाई केल्या जाणार नाही आंदोलन करते आणि तूर्तास आंदोलन मागे घेऊन आंदोलन यशस्वीरित्या पार पडले  कोरपना तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभारण्यात  आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, भाऊराव कारेकार, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर,सीताराम कोडापे,रसूल भाई , उतम अवताळे,अनिल गोंडे, ताराचंद मुंके, रमजान भाई, इब्राहिम भाई, लक्ष्मण पंधरे, मनोहर चने, किरण शेंडे, अब्दुल रहमान भाई, रमेश बोर्डे, बंडू पितुरकर, निसार शेख,होते आदीची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...