Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *तिळगुळाचा गोडवा जिवनात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*तिळगुळाचा गोडवा जिवनात उतरवा : आमदार सुभाष धोटे* *आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व राजुरा महिला काँग्रेस द्वारा मकरसंक्रांत महोत्सवाचे आयोजन*

*तिळगुळाचा गोडवा जिवनात उतरवा : आमदार सुभाष धोटे*    *आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व राजुरा महिला काँग्रेस द्वारा मकरसंक्रांत महोत्सवाचे आयोजन*

*तिळगुळाचा गोडवा जिवनात उतरवा : आमदार सुभाष धोटे*

 

*आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व राजुरा महिला काँग्रेस द्वारा मकरसंक्रांत महोत्सवाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-आमदार सुभाष धोटे मित्रमंडळ व राजुरा महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे मकरसंक्रांत महोत्सव, हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मकरसंक्रांतीच्या पावन पर्वाला आपल्या जिवनात महत्त्वाचे स्थान आहे. आज विविध आधुनिक उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महिला भगीणी हळदी कुंकू या पारंपरिक संस्काराला नाविन्याची जोड देऊन जपत आहेत. हे सर्व स्वागतार्ह आहे. महिला भगीणींनी तिळगुळाचा गोडवा आपल्या जिवनात उतरवून आपला संसार सुखाचा करावा, जीवनात उत्तरोत्तर प्रगती साधावी असे आवाहन केले.यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम पल्लवी वाढई, द्वितीय अश्विनी गजभिये, तृतीय माधुरी सातपुते, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम सुमित्रा कुचनकर, द्वितीय निता बानकर, तृतीय वैशाली कांबळे, समुह नृत्य स्पर्धेत प्रथम एकता महिला गृप, अंगदनगर, बामणवाडा, द्वितीय यंग लेडी गृप, शिवाजी वार्ड, राजुरा, तृतीय शालूताई लांडे आर्वी गृप यांनी पारितोषिक पटकाविले. आयोजकांकडून सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्व महिला भगीणींना आकर्षक वान देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. शुभांगीताई धोटे, प्रमुख अतिथी ऋषालीताई धोटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, आशा खासरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, माजी नगरसेविका मिनाताई लांडे, दिपा करमरकर, गिता रोहणे, शालूताई लांडे, ज्योतीताई शेंडे, इंदूताई निकोडे, सुमित्रा कुचनकर, गिरीजा जगताप, कविता उपरे, पूनम गिरसावळे, अर्चना गोनेलवार, निता बानकर, मनिषा देवाळकर, नमिता भटारकर, अर्चना गर्गेलवार, नंदा गेडाम, वर्षा कानकाटे, कामिना उईके, मूनताई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर यांनी केले. सुत्रसंचालन अंजली गुंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे यांनी केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला भगीणी उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...