Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस येथे दोन दिवसीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस येथे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

घुग्घुस येथे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

 

 

घुग्घुस : बोधिसत्व विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकॄती पुतळयाच्या वर्धापन दिन निमित्त बौद्ध धर्म सर्कल समीती घुग्घुस व नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 व 27 जानेवरीला दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परीसर घुग्घुस येथे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि 26 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता धम्म संमेलनाचे उद्घघाटन पूज्यनीय भंते करूणानंद थेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.त्यानंतर भिख्खुसंघातर्फे धम्मदेशनेचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत भारतीय संविधाना समोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर परीसंवाधाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव बावलकर,जेष्ठ साहित्यिक,आदीलाबाद तेलंगाना तर प्रमुख वक्ते प्रा.संजय मगल,फुले शाहु आंबेडकरी विचारवंत,ब्रम्हापुरी येथुन राहणार आहे.

यावेळी विशेष अतिथी किशोर जोरगेवार (आमदार चंद्रपुर) डाॅ जितेन्द्र गादेवार (मुख्धिकारी नगरपरिषद घुग्घुस)आभासचंद्र सिंह (महाप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र)आसीफ रजा शेख (थानेदार घुग्घुस)पास्टर रेव्ह मार्कस खांडेकर(सेन्च थामस चर्च घुग्घुस)सरदार संम्मत सिंह दारी(गुरूद्वारा घुग्घुस)शहनाज पठान(संचालिका इदिरा गांधी महाविद्यालय घुग्घुस)मधुकर मालेकर (सत्यशिव गुरूदेव सेवा मंडल घुग्घुस)यांची उपस्थिती राहणार आहे.

 

सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत जागतिकीकरणाच्या युगात बौद्धाच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेची आवश्यकता हा परिसंवाद ठेवण्यात आलेला आहे.

या परिसंवादाचे मुख्य मार्गदर्शक डाॅ.राजरत्न अशोकराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे राहणार असुन यावेळी परीसंवादाला प्रमुख उपस्थिती दिनेश हनुमंतेजी,राज्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मुंबई ,संघटन विजय बंसोड, अमन कांबळे संचालक आवाज इंडिया टी व्ही चैनल, नाना देवगळे हे प्रमुख पाहुने उपस्थित राहणार आहे.

त्यानंतर सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा याचे संगीतमय प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

दि.27 जानेवरी दुपारी 12:30 वाजता भारतीय संविधान स्ञियांच्या सर्वांगीण उत्थानाचा मार्ग या विषयावर चर्चा सञेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या चर्चा सञेचे अध्यक्ष डाॅ.वामन गवई,(अमरावती) प्रमुख वक्ते म्हणून स्मिताताई ताकसांडे,(नागपुर हाईकोर्ट)डाॅ.अंजलीताई साळवे(नागपुर) सिमाताई मेश्राम,नंदाताई तायवाडे,(अमरावती) येथून उपस्थित राहणार आहे.

दुपारी 4 वाजता दुस-या सञामध्ये युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग व आंबेडकरी चळवळीमध्ये युवकांची भुमीका या चर्चासञाचे आयोजन करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.ललित खोब्रागडे असिस्टैंट डायरेक्टर टाऊन प्लानिंग मुंबई ,प्रमुख पाहुने पवन मेश्राम डाॅ.आंबेडकर बिजनेस स्कूल फाऊडर नागपुर, इत्यादी मार्गदर्शन करणार आहेत.

या नंतर सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहीर साहेबराव येरेकर यांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत.असे बौद्ध सर्कल समिती घुग्घुस अध्यक्ष भिमेंद्र कांबळे यांनी कळविले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध सर्कल समिती घुग्घुस अध्यक्ष भिमेंद्र कांबळे ,श्याम कुमरवार(महासचिव)देवानंद सुटे(कोषाध्यक्ष)भारत साळवे(उपाध्यक्ष)अशोक रामटेके,भारत जिवने,दिप्तीताई सोनटक्के,नम्रदाताई खोब्रागडे,दिपक कांबळे,पियुष कोवले,योगीताताई मुन,उर्मिला लिहीतकर,विजय रामटेके ,संगीता मंडपे,उपस्थित राहणार आहे.

नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुस उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड,समीउद्दीन शेख (सचिव)अशोक रामटेके(कोषाध्यक्ष)सुजित सोनटक्के(सहसचिव)बबलु सातपुते(संघटक)देवेंद्र गोहलोत(सदस्य)मुरली चितलवार,अनिरुद्ध आवळे,रोशन पचारे यांच्या वतीने करण्यात आलेला असुन यामध्ये बौद्ध सर्कल समिती मधिल सर्व समित्याचे सदस्य,सर्व विहार समित्य,युवक मंडळ,महीला मंडळ,या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिवस-राञ परिश्रम घेत असुन घुग्घुस व परिसरातील सर्व समाजाच्या जनतेने जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अव्हान बौद्ध सर्कल समीती व नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुस तर्फे करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...