Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस शहराच्या इतिहासात...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलश यात्रा

घुग्घुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलश यात्रा

 

 

श्रीरामाच्या जयघोषाणे शहर दुमदुमले

 

घुग्घुस :

 

येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे सोमवार, २२ जानेवारी रोजी दुपारी श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त घुग्घुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलश यात्रा काढण्यात आली.

 

साडे पाचशे वर्षानंतर राम मंदिराचे निर्माण झाले आहे. २२ जानेवारीला या विशाल मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठया भव्यतेने आयोजित करण्यात आला.

 

घुग्घुस शहरात सुद्धा हा उत्सव मोठया भव्यतेने साजरा करण्यात आला.  जवळपास ४ ते ५ हजार महिलांची भव्य कलश यात्रा रावण दहन मैदान अमराई येथून काढण्यात आली सोबत १० ट्रॅक्टरवर विविध देवी देवतांच्या देखाव्यासह, झाकीयां, भजन, लेझीम पथकाचा समावेश होता.

भव्य कलश यात्रेत लहान मुले, महिला, पुरुष, वयोवृद्ध असे जवळपास ८ ते १० हजार रामभक्त सहभागी झाले होते.

 

जय श्रीरामाच्या जयघोषाणे घुग्घुस शहर दुमदुमुन गेले तसेच ठिकठिकाणी भगवे तोरण, स्वागत गेट, बॅनर लावण्यात आल्याने घुग्घुस शहर भगवामय झाले होते आणि घुग्घुस शहराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते.

 

विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेतर्फे शीतपेय, मसाला भात, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. गांधी चौक, जुनाबसस्थानक, नवीन बसस्थानक मार्गे मार्गक्रमण करीत राम मंदिर रामनगर येथे कलश यात्रेचे समापन करण्यात आले.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते राम मंदिराच्या शेडचे लोकार्पण करण्यात आले.

 

राम मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठया संख्येत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...