Home / चंद्रपूर - जिल्हा / रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा...

चंद्रपूर - जिल्हा

रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला : डॉ. अशोक जीवतोडे

रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला : डॉ. अशोक जीवतोडे

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

चंद्रपुर :श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथील रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण होते. या उत्सवात व उत्साहात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सक्रिय सहभाग घेत सिव्हील लाईन चौकात भक्तिमय वातावरण निर्माण केले. आठवडा भरापासूनच साफ स्वच्छता, राम-धून, हनुमान मंदीरात पूजापाठ आदी उपक्रमातून रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचे उत्साही व धार्मिक वातावरण तयार केले.

आज (दि.२२) ला विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथे रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, स्थानिक सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदीरात दिपप्रज्वलन, पुजा, अर्चना, होम, हवन, प्रार्थना, रामधुन करण्यात आली तथा स्थानिक सिव्हील लाईन चौकात बुंदी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिसरातील या भक्तिमय वातावरणात शेकडो जनतेनी सहभाग नोंदविला व महाप्रसादाचा लाभ घेतला. १२:२० ला रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा होताच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. जय श्रीरामचा एकच जयघोष परिसरात घुमू लागला. अत्यंत उत्साही व प्रसन्न वातावरणात सामाजिक एकोपा वाढवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला आहे. मनामनात असलेला राम माणसा माणसात मर्यादा व प्रेम वृध्दिंगत करीत आहे. संपूर्ण देश आज एक होवून जगाला भक्ती व शांती अर्पण करीत असल्याचे चित्र आहे.यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...