Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *विद्यार्थ्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे श्रीधरराव गोडे ; क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव*

*विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे  श्रीधरराव गोडे ; क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव*

*विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे श्रीधरराव गोडे:  क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांतील उपजत कलागुनांना वाव देण्यासाठी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे.याच माध्यमातून त्याचा सर्वांगीण विकास होतो असे मत ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे यांनी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचलित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यक्त केले.या महोत्सवाचे उद्घघाटन चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून  ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाऊराव कारेकर , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचें , माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम कोडापे , माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी कोवे , ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अय्याज अहमद पटेल , सहसचिव प्रा.अरुण कुकडे ,ज्येष्ठ संचालक नामदेव जोगी ,  संचालक गणेश गोडे,  अरविंद कारेकर, सुभाष जोगी विलास बोरडे, राजेश्वर जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन चे उपसभापती पुंडलिक ठाकरे, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बोंडे , सेवानिवृत्त माजी प्राचार्य डी जी खडसे, पर्यवेक्षक के डी घुगुल,नारायण हजारे , प्रा.ज्योती येरावार, संगीता खडसे , पत्रकार मनोज गोरे, जयंत जेनेकरआदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना श्रीधरराव गोडे यांनी शाळेच्या निर्मितीपासून आज गायतच्या प्रगतीचा आढावा मांडला. विजयराव बावणे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती त्यांच्यातील विविध उपजत कलागुणाना सामोरे आणून प्रयोगशील व कार्यात्मकरित्या साधली पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी विद्यालय व महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य डी जी खडसे , सहाय्यक शिक्षक एस व्हि बावणे, पी पी उईके, एल के गायधने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच दहावी बारावी, एन एम एम एस शिष्यवृत्ती पात्र , छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक नामदेवराव जोगी यांचा शतकपूर्ती निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वेशभूषा एकल सामूहिक नृत्य गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी बी बोंडे , संचालन गणेश गोडे तर आभार मने सर यांनी केले.यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...