वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :
येथील प्रयास सखी मंचच्या वतीने मंगळवार, २ जानेवारी रोजी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना केल्याची घटना सोमवार, १ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक मागणी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी केली आहे.
या ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करने आवश्यक आहे.
प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार आसिफराजा शेख यांची पोलिस ठाण्यात भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, सुषमा सावे, अमीना बेगम, पुष्पा रामटेके, माधुरी चोखांद्रे, सुधा उरकुडे, गुलशन बानो, जकरून बानो शेख, सुनीता घिवे, शारदा झाडे, वैशाली भालशंकर, शारदा फुलझले, छाया पाटील, प्रीती बोत्रा, विमल इंगोले, शुभश्री किन्हेकर, शोभा माकोडे, आरती पुसाटे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, वैष्णवी मडावी, कुमुदिनी हनुमंते, पायल वाडगुरे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...