वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : केंद्र शासनाने नवीन चालक कायदा विरोधात आज शहरातील सर्व चालकांनी आपले वाहन आहे त्याठिकाणी ठेवून सदर कायद्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली
कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला ठाणेदार आसिफ राजा यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 : 30 वाजेपासून जोरदार निरदर्शने केलीरद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा
मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला
केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करवून घेतला यानुसार चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यास चालकाला अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे
चालक पळून गेला असता व दोषी आठळल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा व सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.चालकांच्या मते वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो सात लाख दंड देऊ शकत नाही.व सात वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.
सदर आंदोलनात काँग्रेस नेते अनिरुद्ध आवळे, अलीम शेख,विशाल मादर,रफिक शेख,व चालक अनंता बिराडे,श्याम तिरगुटला,राजू आसपवार,संतोष भारती,शंहशह शेख,बालाजी पतंगे,विजय बेहेवार,जावेद शेख,नेतूराग,आरिफ खान,अकबर अली,राजेश श्रीवास,मुस्तुफा साहू,शहनवाज खान,हिफाज खान, सयाराम सर्वां,शाम कोंडागुर्ला,मोहरम अली,बुधराज कश्यप व मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...