Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुक्यातील नागरिकांनी दिला आरोग्य व डोळे तपासणी केंद्रावर उत्स्पूर्त प्रतिसाद.* *सरत्या वर्षात अनेक नागरिकांची मोफत आरोग्य व डोळे तपासणी, सावली तालुका काँग्रेस कमिटिचा सेवाभावी उपक्रम*

*सावली तालुक्यातील नागरिकांनी दिला आरोग्य व डोळे तपासणी केंद्रावर उत्स्पूर्त प्रतिसाद.*    *सरत्या वर्षात अनेक नागरिकांची मोफत आरोग्य व डोळे तपासणी, सावली तालुका काँग्रेस कमिटिचा सेवाभावी उपक्रम*

*सावली तालुक्यातील नागरिकांनी दिला आरोग्य व डोळे तपासणी केंद्रावर उत्स्पूर्त प्रतिसाद.*

 

*सरत्या वर्षात अनेक नागरिकांची मोफत आरोग्य व डोळे तपासणी, सावली तालुका काँग्रेस कमिटिचा सेवाभावी उपक्रम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक३० डिसेंबर २०२३सावली तालुक्यातील कवठी,पालेबारसा व हरांबा येथील यशस्वी आरोग्य व डोळे तपासणी शिबिरा नंतर मौजा.चांदली बुज येथे २०२३ वर्षातील अंतिम शिबीर घेण्यात आले,यावेळी आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली.विरोधी पक्षनेते व या सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे कार्यक्रम तालुक्यातील अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने पार पडले,मौजा.चांदली येथील उदघाटनाचा कार्यक्रम सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.उषाताई तसेच माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार व उपसभापती सौ.मंगलाताई चिमड्यालवार   यांच्या हस्ते पार पडले.विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून यावेळी ८००-८५० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ७००-७५० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ६०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे. शिबिरा निमित्य बोलताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी " मा.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचे जनसेवा हिच ईश्वर सेवा मानलेले व्रत त्यांचे सेवभावी कार्य प्रेरणादायी असून सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सामान्य जनतेच्या हिताचे कार्य अविरत सुरु असून येत्या  काळात विविध समाजोपयी कार्य राबविले जाणार आहेत" असे प्रतिपादन केले या शिबिरा प्रसंगी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विजय मुत्यालवार,गावचे सरपंच मा.विठ्ठल येग्गावार,जेष्ठ कार्यकर्ते मा.गजानन सा.चिमड्यावार,गाव काँग्रेस कमिटी चांदलीचे अध्यक्ष मा.विकास पुप्परेड्डीवार, उपसभापती प.स सावली मा.राजेंद्र भोयर,सेवा सहकारी अध्यक्ष मा.विलास येंगटीवार, सावली महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार,नगरसेवक मा.गुणवंत सुरमवार,ग्रामपंचायत सदस्य सौ.योगिता संतोषवार,व मा.सीताराम कोडापे,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, सौ.शिला गुरुनुले,गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.राकेश गुंडावार,पोलीस पाटील मा.चिंतामण बालमवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.विस्तारी आरेवार,मा.कौशल चिमड्यावार,मा.स्वप्नील चन्नावार आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...