Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग कामासाठी अंतरगाव नाला पोखरला* *रेती उपसा मनाई असताना रेतीचे उत्खनन* *खणीकर्म विभाग गाढ झोपेत*?

*राष्ट्रीय महामार्ग कामासाठी अंतरगाव नाला पोखरला*    *रेती उपसा मनाई असताना रेतीचे उत्खनन*    *खणीकर्म विभाग गाढ झोपेत*?

*राष्ट्रीय महामार्ग कामासाठी अंतरगाव नाला पोखरला*

 

*रेती उपसा मनाई असताना रेतीचे उत्खनन*

 

*खणीकर्म विभाग गाढ झोपेत*?    

   

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग करिता कोरपना तालुक्यातील संपूर्ण नाले पोखरल्या जात आहे असे असताना मात्र खनिकर्म विभाग व जिल्हाधिकारी यांच्या देण्यात आलेल्या मंजुरी पत्रामध्ये रेतीचा उपसा करता येणार नाही तसेच शेतीला किंवा नाल्या काठावर नियम प्रमाणे उत्खनन करण्याबद्दल शासनाचे धोरण आहे तसेच मुरूम दगड उत्खननासाठी दिलेल्या मंजुरी आदेशामध्ये अटी व शर्ती टाकून दिलेले आहे मात्र या सर्व आदेशाला केराची टोपली दाखवत नियमबाह्य मंजुरी पेक्षाही अधिक उत्खनन अविरत 24 तास GRIL या कंपनीकडून केल्या जात आहे मात्र याबाबत महसूल विभाग आणि कर्म विभाग या प्रकरणाकडे डोळेझाक करीत असून तक्रारीची साधी चौकशी न करणारे खनीकर्म विभागातील ते महाभागबिनधास्त अधिकारी कोण याची सर्वत्र चर्चा आहे शेतीसाठी राज्य शासनाचेधोरण ठरले असून याकडे दुर्लक्ष करीत कडोली वनोजा अंतरगाव धामणगावया नाल्यावर पंचनामा किंवा मोजमाप केल्या गेले नाही जलसंधारण अधिकारी मोक्यावर जाऊन कुठलीच तपासणी केली नाही मान्यतेपेक्षा अधिक उत्खनन सर्रास केल्या जात असून आसन नाला पुलाजवळ वडगाव शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नाल्यातून पोखरलेल्या रेतीचा वापर केल्या जात आहेतसेच देवघाट झाल्यावर कुसळ धानोली माथा फाटा४ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण उध्वस्त झाले असून ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहे प्रधानमंत्री सडक योजनेतून ह्या रस्त्याचा निर्माण २वर्षांपूर्वी करण्यात आला होता या रस्त्याची वाहन अतिभार मर्यादा ३० टनाची असताना ७० ते ८० टन दगड माती मुरूम रेतीची वाहतूक करून पूर्ती रस्त्याची वाट लागली आहे यामुळे या कंपनीच्या मुजोरीने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पायाभूत सुविधा कोणताही उपक्रम या कंपनीने राबवलेला नाही उलट पाषाण उघडे पडेपर्यंत रेती मुरूम दगड उत्खनन करून नाल्या काठावरील गावांना पाणी टंचाईचा फटका निर्माण झाला आहे महसूल विभाग मान्यतेपेक्षा अधिक उत्कलन झाल्याबद्दल कारवाई करणार का तहसीलदार कोरपणा यांनी उत्खननाचा अहवाल व मोजमाप करण्याबद्दल ची मागणी केली आहे मात्र तक्रारी व अहवाल बसताना बांधून आंधळ दळतंय कुत्र पीठ खाते बोलणार कोण अशी अवस्था राष्ट्रीय महामार्गाच्या कंतत्राटदाराची मनमानी सुरू असून कोरपणा येथील नव्यानेच रुजू झालेले IAS अधिकारी यांनी अवैध उत्खननाचे २वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे मात्र खनिकर्म विभाग खळबळून अजून जागा झालेला नाही यामुळे नेमकं पाणी कुठे मुरत आहे त्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उत आला आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...