Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *भारुड भजन स्पर्धेचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*भारुड भजन स्पर्धेचा थाटात समारोप : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण* *जगन्नाथबाबा महिला भारूड मंडळ सावलहिरा प्रथम, छत्रपती शिवाजी महाराज वारकरी भजन मंडळ, नारपठार द्वितीय तर श्री. संत कार्तिक स्वामी भजन मंडळ दरूर तृतीय क्रमांकाचे मानकरी*

*भारुड भजन स्पर्धेचा थाटात समारोप : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण*    *जगन्नाथबाबा महिला भारूड मंडळ सावलहिरा प्रथम, छत्रपती शिवाजी महाराज वारकरी भजन मंडळ, नारपठार द्वितीय तर श्री. संत कार्तिक स्वामी भजन मंडळ दरूर तृतीय क्रमांकाचे मानकरी*

*भारुड भजन स्पर्धेचा थाटात समारोप : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण*

 

*जगन्नाथबाबा महिला भारूड मंडळ सावलहिरा प्रथम, छत्रपती शिवाजी महाराज वारकरी भजन मंडळ, नारपठार द्वितीय तर श्री. संत कार्तिक स्वामी भजन मंडळ दरूर तृतीय क्रमांकाचे मानकरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-श्री. संत एकनाथ महाराज व श्री. दत्त जयंती चे औचित्य साधून राजुरा येथे दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२३ रोजी दिवस रात्र पाळीत दोन दिवसीय भारुड स्पर्धेचे आयोजन आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ च्या सौजन्याने करण्यात आले होते. दि. २७ डिसेंबर सकाळी १० वाजता आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुराचे आराध्य दैवत माता भवानीचे विधीवत पुजन व दर्शन घेऊन भवानी मंदिर येथून भव्य दिंडी यात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण राजुरा नगरी दुमदुमली होती. दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण, मान्यवरांचा सत्कार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते अशोकराव देशपांडे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, देवराव ठावरी व्यासपीठावर उपस्थित होते.या स्पर्धेत राजुरा, गोंडपीपरी, कोरपना, जिवती येथील ६० भजन मंडळ सहभागी झाले होते. यात प्रथम पारितोषिक नाथ जगन्नाथबाबा महिला भारूड मंडळ सावलहिरा ला २१००० रू, द्वितीय छत्रपती शिवाजी महाराज वारकरी भजन मंडळ, नारपठार ला १९००० रू, तृतीय श्री. संत कार्तिक स्वामी भजन मंडळ दरूर ला १७००० रू, चतुर्थ श्री गुरुदत्त कृपा भारुड महिला मंडळ जवाहर नगर राजुरा ला १५००० रु, पाचवे कोंडा या स्वामी भारुड भजन मंडळ हिवरा ला १३००० रू, सहावे ओम चैतन्य महिला भजन मंडळ जैतापूर ला ११००० रू सातवे ढवस परिवार महिला भारुड मंडळ भेंडाळा ला ९००० रु, आठवे ओम साई भजन मंडळ राजुरा ला ७००० रु, नववे ज्ञानेश्वर माऊली महिला भारुड भजन मंडळ ईरई ला ५००० रु, दहावे एकाएकी महिला भजन मंडळ ईसापूर ला ३००० रु अकरावे सुरभी महिला भजन मंडळ राजुरा ला २००० रु तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलकी वादक अंबादास नागापूरे २००१ रू, उत्कृष्ट गायक पवन हनुमंते २००१ रुपये व सन्मानचिन्ह देऊन आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गौरविण्यात आले. इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आयोजित भारूड भजन स्पर्धेच्या समारोपिय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक देवराव ठावरी यांनी तर आभार प्रदर्शन सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी केले. दिंडी, उद्घाटन, सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...