Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा येथे भारुड भजन...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा येथे भारुड भजन स्पर्धेचे उद्घाटन : भव्य दिंडी व भक्तीने दुमदुमली राजुरा नगरी* *आमदार सुभाष धोटे मित्र मंडळाचे आयोजन*

*राजुरा येथे भारुड भजन स्पर्धेचे उद्घाटन : भव्य दिंडी व भक्तीने  दुमदुमली राजुरा नगरी*    *आमदार सुभाष धोटे मित्र मंडळाचे आयोजन*

*राजुरा येथे भारुड भजन स्पर्धेचे उद्घाटन : भव्य दिंडी व भक्तीने  दुमदुमली राजुरा नगरी*

 

आमदार सुभाष धोटे मित्र मंडळाचे आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- श्री. संत एकनाथ महाराज व श्री. दत्त जयंती चे औचित्य साधून इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या भव्य पटांगणावर दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय भारुड ढोलकी स्पर्धेचे आयोजन आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ च्या सौजन्याने करण्यात आले आहे. या स्पर्धेत राजुरा, गोंडपीपरी, कोरपना, जिवती येथील जवळपास ८० भजन मंडळी सहभाग घेतला असून या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या भारूडांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात प्रथम पारितोषिक रोख रक्कम २१०००, द्वितीय १९०००, तृतीय १७०००, चतुर्थ १५००००, पाचवे १३००० सहावे ११००० सातवे ९०००,आठवे ७०००, नववे ५००० दहावे ३००० अकरावे २००० तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलकी वादक २००१ उत्कृष्ट गायक २००१ रुपये अशा पारितोषिकांचा समावेश आहे.आज दि. २७ डिसेंबर सकाळी १० वाजता आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुराचे आराध्य दैवत माता भवानीचे विधीवत पुजन व दर्शन घेऊन भवानी मंदिर येथून भव्य दिंडी यात्रा काढण्यात आली. यावेळी स्वतः आ. सुभाष धोटे यांनी पारंपरिक वारकरी वेषभूषा धारण करून विविध भजनाच्या तालावर ठेका घेत सहभाग घेतला. भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण राजुरा नगरी दुमदुमन गेल्याचा साक्षात्कार सर्वांनी अनुभवला. यानंतर दुपारी १ वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, संचालक तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, जेष्ठ व्यापारी सुधाकर बोनगिरवार, दिनकर कर्नेवार, माजी नगरसेवक गजानन भटारकर, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, धनराज चिंचोलकर, इर्षाद शेख, प्रणय लांडे, कोमल फुसाटे, आशिष नलगे, विलास कोंगरे, दिपक पानघाटे, मारोती आगलावे, कुशाल गोहकार, दिवाकर वाघमारे, पुंडलिक तुरनकर यासह राजुरा आणि परिसरातील अनेक गनमान्य नागरिक, भारूड भजन मंडळाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव ठावरी यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. दिंडी व कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...