Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नाताळ सण प्रेम, शांती...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नाताळ सण प्रेम, शांती आणि करूणेचा संदेश घेऊन येतो! - देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.

नाताळ सण प्रेम, शांती आणि करूणेचा संदेश घेऊन येतो! - देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.

**

 

भाजपकडून घुग्घुस येथील विविध चर्चना भेटी व ख्रिस्ती धर्मीयांना शुभेच्छा.

 

घुग्घुस, दि. २५ डिसेंबर

आज नाताळच्या (ख्रिसमस) निमित्ताने शहरातील न्यू अपोस्टोलिक, एस. टी.थॉमस सी. आय. एन, बिलिवर्स  आणि शालोम गोस्पेल या चर्चमध्ये राजुरा विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात शहर भाजपकडून भेटी देत उपस्थित ख्रिस्ती धर्मीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.

           यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पोलिस निरिक्षक आसिफ राजा शेख, माजी सरपंच संतोष नुने, माजी जि. प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, विनोद चौधरी, माजी ग्रा. पं. सदस्य साजन गोहने, सिनु इसारप, हसन शेख, सुरेंद्र जोगी, मारोती वांढरे ,विजय पचारे यांचेसह ठिकठिकाणी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवाची उत्साहपूर्ण उपस्थिती पाहायला मिळाली.

याप्रसंगी न्यू अपोस्टोलिक चर्च मध्ये शुभेच्छापर बोलतांना देवराव भोंगळे म्हणाले की, ख्रिस्ती धर्मीयांचा महत्वपूर्ण सण असलेला नाताळ हा संपुर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; खरंतर प्रभू येशूच्या जन्माचा आनंद द्विगुणित करीत साजरा होणारा नाताळ प्रेम, शांती आणि करूणेचा संदेश घेऊन येतो. भारतात अनेक जातीधर्माचे लोक एकत्र राहतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या घुग्घुस शहरातही देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व धर्माचे बांधव मोठ्या गुण्यागोविंदाने एकोप्यात राहतात. सर्व धर्माचे सणोत्सव आपण सर्व मिळून साजरे करतो, एकमेकांच्या सुखदुःखात सामिल होतो त्यामुळे संबंध चंद्रपूर जिल्ह्यातही सामाजिक समरसतेचे द्योतक म्हणून घुग्घुस शहराची ओळख आहे. हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे.

पुढे बोलताना, जे भक्त प्रभू येशू मसिहा प्रती श्रद्धा ठेवतात त्यांना कायम चांगले कार्य करण्याची सकारात्मक उर्जा मिळते. घुग्घुस शहराच्या विकासासाठी देखील आम्हाला निमित्यमात्र ठेऊन प्रभूने शहरवासीयांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली आहे. सेवा आणि करूणेच्या याच तत्वावर आजही आमचे सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहेत. कालपासून आपण सर्व ख्रिस्ती बांधवांनी या आनंददायी नाताळची सुरुवात केली, काल घुग्घुस शहरामध्ये मिरवणुक काढून संपूर्ण शहरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण केले त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन करीत पुणःश्र्च सर्वांना नाताळच्या मनापासून शुभेच्छा देतो. असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...