Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *शरद जोगींवर कारवाई...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*शरद जोगींवर कारवाई करा,अन्यथा राज्यभर आंदोलन:जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन* *जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन*

*शरद जोगींवर कारवाई करा,अन्यथा राज्यभर आंदोलन:जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन*      *जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन*

*शरद जोगींवर कारवाई करा,अन्यथा राज्यभर आंदोलन:जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन*

 

 

*जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

   चंद्रपूर:- गडचांदूर येथील नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद सुरेश जोगी यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या कोरपना तालुका उपाध्यक्ष गणेश लोंढे यांना मारहाण केली,मोबाईल फोडला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.शरद जोगी यांना अटक करून गुन्हा दाखल करावा,अन्यथा महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 'राजेश सोलापन' यांनी दिली आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते 'शरद सुरेश जोगी' यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या 'J-पॅलेस' नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली.यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तथा कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार 'गणेश लोंढे' यांनी शरद जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून 'J-पॅलेस' बार मध्ये बोलवले.दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील पत्रकार 'दिपक शर्मा' आणि नांदा येथील पत्रकार 'धनराज शेखावत' हे दोघे बसून होते.पत्रकार गणेश,यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत 'तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना,असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो', अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती.पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करावी,अन्यथा ग्रामीण पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदर प्रकरणी जातीने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी यावेळी चर्चे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळीस ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा महासचिव पुरुषोत्तम चौधरी उपाध्यक्ष अनिलजी देठे मार्गदर्शक धर्मेशजी निकोसे ,कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, सहसचिव प्रभाकर आवारी, कोरपना ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सैय्यद मुमताज अली, गणेश लोंढे उपाध्यक्ष गौतम काशिनाथ धोटे ,अनिल  नीलकंठ गेडाम, प्रवीण चरणदास मेश्राम,जिवती तालुकाध्यक्ष शंकर चव्हाण ,उपाध्यक्ष सुग्रीव जी गोतावळे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...