Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा क्षेत्रातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा क्षेत्रातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल मंजूर करा : मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली मागणी* *आ. सुभाष धोटेंनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा*

*राजुरा क्षेत्रातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल मंजूर करा : मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली मागणी*    *आ. सुभाष धोटेंनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा*

*राजुरा क्षेत्रातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल मंजूर करा : मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली मागणी*

 

*आ. सुभाष धोटेंनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्हयातील राजुरा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी तालुक्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिक वास्तव्यास असून त्यातील अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच दि 8 डिसेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील 1799 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निघालेला असून त्यात माझे मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांचा समावेश दिसून आलेला नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू नागरीक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी तालुक्यातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुले तात्काळ मंजूर करण्यात यावीत अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.विशेष म्हणजे या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर, जिवती, सावली, भद्रावती या तालुक्यातील 1799 व्यक्तिगत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला कार्योत्तर मंजुरी मिळाली असून दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शासन आदेश निघाला आहे. या योजनेंतर्गत राजुरा, कोरपना, गोंडपिपरी सह जिल्ह्यातील इतरही उर्वरित तालुक्यातील विमुक्त जाती /भटक्या जमाती प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्याची यादी पंचायत समिती कडून जिल्हा स्तरीय समितीकडे पाठविले असतांना जिल्हा स्तरीय समितीने शासनाकडे पाठविलेल्या फक्त 1799 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विमुक्त जाती / भटक्या जमातीतील नागरिकांवर अन्याय झालेला आहे. आ. धोटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे कि, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना लाभ देण्यासाठी राजुरा, कोरपना, गोंडपिपरी सह जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांचा समावेश करून या प्रवर्गातील गोर- गरिबांना हक्काच घरकुल देण्याबाबत.निर्णय घेतला जावा. यासाठी आ. धोटे यांनी हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...