वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-दिनांक 16/12/2023 रोज शनिवारला एक अदभूत उपक्रम " खरी कमाई " अंतर्गत " बाल आनंद मेळाव्याचे " आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येथे उत्स्फूर्तपणे साजरे करण्यात आले .
सदर " बाल आनंद मेळाव्याचे " रीतसर उद्घाटन सन्माननीय नारायणजी हिवरकर शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद पेंदाम सर, उद्घाटक श्री. नारायण जी हिवरकर, प्रमुख अतिथी आणि परीक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यपिका कु पुष्पा सोयम ,आणि कनिष्ट सहायक प्रियंका भगत उपस्थित होते.
मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी "बालआनंद मेळावा " आयोजित करण्यात आला होते...
आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची सजावट, त्यांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. या बाल आनंद मेळवाला यशस्वी करण्यासाठी श्री. स्वतंत्रकुमार शुक्ला श्री. संजय डोये, कु. अफसना अली, कु. रोहिणी आडे, श्री.सुरज जुनघरी, श्री. प्रफुल जीवने, कु. प्रियांका भगत, श्री. मनवर आदींनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य , विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद सोहळ्यात आनंद घेतला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रफुल जीवने, तर आभार प्रदर्शन श्री. एस. के. शुक्ला यांनी केले.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...