Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सामाजिक दायीत्व निधि...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सामाजिक दायीत्व निधि कामाची चौकशी करा* *शेतकऱ्यांचा कल्याणासाठी योजना राबवा:आबिद अली यांची मागणी*

*सामाजिक दायीत्व निधि कामाची चौकशी करा*  *शेतकऱ्यांचा कल्याणासाठी योजना राबवा:आबिद अली यांची मागणी*

*सामाजिक दायीत्व निधि कामाची चौकशी करा*

*शेतकऱ्यांचा कल्याणासाठी योजना राबवा:आबिद अली यांची मागणी*

   

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यामध्ये चार सिमेंट उद्योग कार्य रत असून नव्या मुकटबन येथील सिम कंपनीला परसोडा येथील चुनखडी उत्खननाचे पट्टे मंजूर झाले आहेत कोरपणा तालुक्यातील सिमेंट उद्योग यामुळे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र प्रदूषित झाले असून उत्खननाच्या खदानी खड्ड्यामुळे पाण्याची पातळी भुगर्भात खालावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असे असताना मात्र गेल्या तब्बल दहा वर्षापासून कोरपणा तालुक्यातील नामांकित सिमेंट उद्योग आणि सामाजिक दायित्व निधी स्वतःच्या उपक्रमावर खर्च करून लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करीत आहे कंपन्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था व इतर सुविधा उपलब्ध देऊन हा निधी खर्च झाल्याचा भास दाखविला जाते मात्र प्रत्यक्षात ज्या,भागांमध्ये सिमेंट उद्योग कार्यरत आहे त्या क्षेत्रातील शेतीतील उभे पिक धूळ वायु प्रदूषणामुळे उत्पादनात सातत्याने घट होत असून केंद्र शासनाच्या व खाणअधिनियमाच्या उल्लघन करीत उत्खनन झाल्यामुळे खोलवर मोठ मोठ्या प्रमाणात चुनखडी उत्खनन झाल्याने त्या खदानी सोबत पंचकोशीतील गावांमध्ये पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली. मात्र कंपन्या निवड देखावा करून स्थानिक प्रकल्प बाधित व प्रदूषण परिसरातील कल्याणासाठी योजना राबवीत नसल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीने आंदोलनासारखे शस्त्र उभारले आहे त्याचबरोबर उत्खनन विस्तार मुळे वन्य प्राण्याचे निवारे नष्ट झाल्याने कंपनी क्षेत्रातील वन्य प्राण्यांचा वावर मैदानी क्षेत्रामध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागतं आहे वन्यप्राणी शेतातील उभे पीक नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांच्या दारावर उत्पादित धान्य येत नाही अशी परिस्थिती आहे स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही त्याचबरोबर लोकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सीएसआर फंड हा निधी प्रकल्पलाभ क्षेत्रातील व प्रकल्प बाधित क्षेत्रात राबविणे हा सामाजिक दायित्व निधी मागील हेतू होता मात्र या कंपन्यांनी तब्बल गेल्या दहा वर्षात असा कोणताही उपक्रम जनकल्याणाचा राबविला नाही व स्वतःच्या प्रकल्प विकासाकरिता राबवल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व यापुढे शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवून तारेचे कुंपण वन्य प्राण्यांच्या हैदोस यामुळे होणारे नुकसान त्यासाठी उपाय योजना रोग निदान शिबिर त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचन क्षेत्रामध्ये वाढ सामुहीक लोक कल्याणकारी सामुहीक उपक्रम योजनाकरण्यासाठी आवश्यक उपाययोजना या निधीतून करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव स आबिद अली  यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना  उदय सामंत यांची भेट घेऊन सामाजिक दायीत्वनिधीच्या गेल्या दहा वर्षात झालेल्या खर्चाची माणिकगड सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट कंपनी .दालमिया सिमेट यासह नव्याने आलेल्या आरसीसीपीएल परसोडा या कंपन्यांना खनिज विकास निधीच्या खर्चाची व योजना अंमलबजावण्याची चौकशी करून पुढील नियोजन हे प्रकल्प बाधित क्षेत्रातील गावाकरिता ग्रामपंचायत करिता मूलभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना यावर भर देण्यात यावा याबाबत निवेदन देऊन मागणी केली असता भेटी झालेल्या चर्चेत मंत्री महोदयांनी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत कोरपना तालुक्यातील सि एस आर निधि चा अहवाल मागवा असे निर्देश दिले

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...