Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *गुंठेवारीने शेत जमिनीची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*गुंठेवारीने शेत जमिनीची विक्री *शासनाच्या महसुलाला लागतोय चुना* *औद्योगिक नगरी नांदा येथील प्रकार*

*गुंठेवारीने शेत जमिनीची विक्री *शासनाच्या महसुलाला लागतोय चुना*    *औद्योगिक नगरी नांदा येथील प्रकार*

*गुंठेवारीने शेत जमिनीची विक्री *शासनाच्या महसुलाला लागतोय चुना*

 

*औद्योगिक नगरी नांदा येथील प्रकार*

चक्क ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारासमोरच अनधिकृत लेआउट

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नांदाफाट:-चंद्रपूर जिल्ह्यातील नावाजलेली  औद्योगिक नगरी अशी नांदा ग्रामपंचायतची ओळख आहे येथे काही भूमाफियांकडून अनधिकृत लेआऊट टाकून गुंठेवारी पद्धतीने प्लॉट विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून भविष्यात रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था अशा मूलभूत सुविधे करिता नांदा ग्रामपंचायतीवर आर्थिक बोझ पडणार आहे महसूल विभाग व ग्रामपंचायत कडून भूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत आहे अनधिकृत लेआऊट संबंधी ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून प्रशासन आता तरी कारवाई करणार का निव्वळ नोटीस देऊन आपले हात झटकून मोकळे होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे सविस्तर वृत्त असे की , नांदा येथील सर्वे क्रमांक 11/2 या शेत जमिनीवर कुठेही शासन परवानगी न घेता अनधिकृत लेआउट टाकून गुंठेवारी पद्धतीने प्लॉट विक्री सुरू केली आहेत 500 ते 350 रुपये प्रति स्क्वेअर फुट दराने काही नागरिकांनी प्लॉट खरेदी केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे गुंठेवारी पद्धतीने साध्या स्टॅम्प पेपरवर विक्री होत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे अनधिकृत लेआउट असल्याने भविष्यात रस्ते नाल्या इलेक्ट्रिसिटी व्यवस्था पाण्याची व्यवस्था अशा मूलभूत सोयी सुविधेकरिता नांदा ग्रामपंचायत वर आर्थिक बोजा पडणार आहे चक्क नांदा ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारासमोरच अनधिकृत लेआऊट टाकले असताना ग्रामपंचायत प्रशासन व महसूल प्रशासनाने अद्याप पावतो स्वतःहून कुठलीही दखल घेतली नाही सदर लेआउट नाल्यालगत असून नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरण करिता मोकळी जागा सोडली नसल्याने पावसाळ्यात नांदा येथील वस्तीमध्ये नाल्याचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे तसेच लेआउट धारकाने  अरुंद रस्ता सोडला असल्याने भविष्यात अडचणीचे ठरणार आहे सदर जमीन काही वर्षांपूर्वी चंद्रपूर येथील एका व्यावसायिकाने  घेतली असून महसूल रेकॉर्डला फेरफार घेतले नसल्याने ही जमीन अजूनही नांदा येथील मूळ मालकाचे नावाने नोंद आहेत याबाबत नांदा ग्रामपंचायत व तहसीलदार यांचे कडे तक्रार करण्यात आली असून

प्रशासन कुठली कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत

*खुलासा मागवून कारवाई करणार*

ग्रामपंचायत च्या गेट समोरच लेआउट  टाकल्याचे दिसते या संबंधाने ग्रामपंचायत ची कुठली परवानगी घेतलेली नाही गुंठेवारी पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे  लेआउट धारकाला नोटीस पाठवून खुलासा मागणार असून तहसीलदारांना पत्र देऊन माहिती कळवीत आहे

*श्रीहरी केंद्रे**ग्रामविकास अधिकारी*

*( ग्रामपंचायत नांदा)*

*स्थानिक तलाठी मात्र मौन*

अनधिकृत लेआउट टाकून प्लॉट विक्रीचा गोरख धंदा सुरू असताना येथील तलाठी मात्र मौन बाळगून आहे तलाठ्याने त्यांचे वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे परंतु तसे झालेले दिसत नाही

*प्रफुल बोढाले*

*(तंटामुक्ती अध्यक्ष नांदा)*

*काम बंद करून कारवाई करणार*

माहिती मिळाल्यानंतर लेआऊट धारकाला काम बंद करण्याकरिता सांगितले आहे वरिष्ठांना माहिती देऊन योग्य ती कारवाई केली जाईल

*विकास चीने**तलाठी साजा नांदा)*

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...