Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा आगारात नविन...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा आगारात नविन बनावटीच्या २० बसेस उपलब्ध करा* *राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी*

*राजुरा आगारात नविन बनावटीच्या २० बसेस उपलब्ध करा*    *राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी*

*राजुरा आगारात नविन बनावटीच्या २० बसेस उपलब्ध करा*

 

राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गॉडपिपरी हे तालुके डोंगराळ, अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुके असून अनेक गावे तालुका मुख्यालयापासून दुरवर वसलेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना तालुक्याचे ठिकाणी शासकिय कामकाज व शिक्षणाकरिता ये - जा करावे लागते मात्र राजुरा आगारात बसेसची कमतरता असल्याने आगार प्रमुखांना नियोजन करणे कठीण जात आहे. अनेक गावांमध्ये बस सेवा उपलब्ध नसल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. गोर गरीब पालकांना खाजगी वाहनाने प्रवास करून आपल्या मुला बाळांचे शिक्षण पूर्ण करणे कठीण जात आहे. परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात बस सेवेची मागणी होत आहे.राजुरा आगारातील ६० पैकी ४० बसेस अतिशय जुन्या झालेल्या असून पहाडी भागात प्रवाशी घेवून जात असताना चालक व वाहक यांची फार मोठी कसरत होत असते, प्रवाशांना आपला जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. राजुरा आगारात BS-6 च्या फक्त १० बसेस उपलब्ध असून त्या बसेस लांब पल्यावर चालत असल्याने ग्रामीण भागाकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार राजुरा आगार (जिल्हा चंद्रपूर) येथे BS-6 नविन बनवातीच्या २० बसेस तातडीने उपलब्ध करून देणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी, आणि या कार्यवाही बाबतचा अहवाल मला अवगत करून द्यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्य, मार्ग परीवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...