Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा.*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा.*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय संविधान दिन साजरा.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक२६ नोव्हें.२०२३ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान मसुदा समितीने घटनेचे प्रारुप घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सोपवले.भारतीयांना समानतेची वागणूक,समान अधिकार तसेच कर्तव्याची जाणीव करुन देणारे संविधान आजच्या दिवशी स्वीकारले गेले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचे कृतज्ञ स्मरण.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता,कल्पकता, कायदेतज्ज्ञ,राज्यशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व चौकस दूरदृष्टी राज्यघटनेमध्ये दिसून येते.तळागाळातील लोकांचा विचार समोर ठेवून सर्वांना समान अधिकार व मूलभूत हक्क संविधानाने दिले,भारतीय संविधान हे जगातील सर्वोतम असे संविधान आहे,भारतीय संविधानाने भारतीय लोकशाही पद्धतीला जगात अधिक बलाढ्य असे स्वरूप दिले आहे.संविधानात लोकशाही, समता व सामाजिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम आहे.या मूल्यांशी सुसंगत असे संस्थात्मक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणत समाजाच्या सर्वंकष उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा निश्चय संविधान दिनानिमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून केला.या प्रसंगी महामानव भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रशांतजी राईंचवार,माजी उपाध्यक्ष नं.प.सावली मा.भोगेश्वर मोहुर्ले,नगर पंचायत सावलीचे आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.गुणवंत सुरमवार,मा. मा.सचिन सांगिडवार,मा.नितेश रस्से, नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.सिमा संतोषवार,सौ.ज्योती शिंदे, तसेच हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके,मा.डोमाजी शेंडे, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,मा.आकाश खोब्रागडे,मा.निखिल दुधे, मा.सुनील ढोले,मा.मृणाल गोलकोंडावार,मा.बादल गेडाम,मा.सुभाष भोयर,यश गेडाम आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...