Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *इरई-भोयगाव नदी पात्रातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*इरई-भोयगाव नदी पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन जोरात* *महसूल विभाग कोमात,पोलिसांची डोळेझाक.*

*इरई-भोयगाव नदी पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन जोरात*    *महसूल विभाग कोमात,पोलिसांची डोळेझाक.*

*इरई-भोयगाव नदी पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन जोरात*

 

*महसूल विभाग कोमात,पोलिसांची डोळेझाक.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-तालुक्यातील इरई-भोयगाव नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास रेती तस्कर लाखों रूपयांची रेती चोरून नदीपात्रालाच भगदाड पाडत असून या रेती तस्करांचे मुसके आवळण्याची गरज आहे.मात्र महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने कमालीची डोळेझाक केल्याने रेती तस्करांना मोकळे रान मिळाल्याचे आरोप होत आहे.कोरपना तालुका हा औद्योगिक दृष्ट्या प्रगत असून तालुक्यातील गाव,शहरात विविध प्रकारच्या बांधकामासाठी रेतीची मोठी मागणी आहेत.सध्या तालुक्यात रेती घाट सुरू नसल्याने अवैध रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत.उदाहरणार्थ इरई-भोयगाव नदी पात्राची जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा,त्याठिकाणी रेतीचे अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे दिसून आले.रेती तस्करांनी रेतीचे वाहन ने-आन करण्यासाठी चक्क JCB ने रस्ता बनवला आहे.सदर नदीपात्रात कित्येक ठिकाणी JCB व ट्रॅक्टरच्या चाकाचे निशान आढळून आले.यावरून सिद्ध होते की,येथे रेतीचे उत्खनन होत आहेत.हा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली असून याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.पोलीस विभाग, मंडळाधिकारी,तलाठी, सरपंच,पोलीस पाटील, यांच्या दुर्लक्षितपणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू असल्याचे खळबळजनक आरोप काही नागरिकांनी केले आहेत.वरिष्ठ अधिकारी याकडे जातीने लक्ष देऊन कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.*'नदीपात्रात जाण्यासाठी गुळगुळीत रस्ता.'*नदीपात्रातून चोरी केलेल्या रेतीचे वाहन वाहतुकीसाठी इरई गावापासून नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला नव्याने सुरळीत,गुळगुळीत व खड्डेमुक्त वनवला आहे.विशेष म्हणजे त्या रस्त्यावरून सार्वजनिक कोणतेही लहानमोठे वाहन चालत नाही,केवळ रेती वाहतुकीसाठीच हा रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.पावसाळा संपला,दिवाळी संपली,आता विविध प्रकारच्या कामांना सुरूवात झाली आहे.रेतीची मागणी वाढल्याने रेती तस्कर सध्या याठिकाणी सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

*'पोलीस व महसूल विभागाची डोळेझाक.'*

गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोयगाव इरई नदीपात्रातून रात्रंदिवस रेतीचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने गडचांदूर,नांदा व इतर गाव, शहरात रेती तस्कर रेतीची वाहतूक करत असल्याचे लोकांना दिसते मात्र,पोलीस आणि महसूल विभागाला का दिसत नाही ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या या रेती तस्करीवर कोणतीच कारवाई होत नसल्याने काही सुज्ज्ञ नागरिकांकडून ठाणेदार आणि महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...